Saif Ali Khan News : सैफ अली खानवर नुकताच हल्ला झाला असून एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून हा हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे. यावेळी सैफच्या घरातील मदतनीसही जखमी झाल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने प्रथम हाऊस हेल्पच्या खोलीत प्रवेश केला आणि नंतर जेह यांच्या खोलीत गेल्याचे वृत्त आहे. जेव्हा घरातील मदतनीस यांना संशय आला तेव्हा त्यांनी जेहला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनाही दुखापत झाली. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरातील कर्मचारी व मदतनीस चर्चेत आहेत. सैफ व करीना देखील त्यांच्या स्टाफबरोबर बसून जेवण करतात. खुद्द करीना आणि मदतनीस ललिता डिसिल्वा यांनी याचा खुलासा केला होता.
करीना कपूरने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले होते की, तिची मुले नानीबरोबर जेवण करतात. करीना म्हणाली होती, “माझी दोन मुलं तैमूर व जेह त्यांच्या मदतनीसबरोबर जेवण करतात. ते एकत्र टेबलवर बसून जेवतात. खरं तर, एक दिवस तैमूरने त्यांना विचारले होते की, नानी त्यांच्याबरोबर जेवण का करत नाही, तेव्हा जेहनेही तोच प्रश्न विचारला. यानंतर सैफ व करिनाने तैमूर व जेहला त्यांच्या नानीबरोबर जेवायला बसायला सांगितले”.
आणखी वाचा – सैफ अली खानबरोबरच शाहरुख खानवरही हल्ला करण्याचा होता प्लॅन, मोठी माहिती समोर, पोलिसांकडून खुलासा
करीना म्हणते की, तैमूर व जेहच्या मदतनीस तितक्याच आदराच्या पात्र आहेत जितक्या तिच्या आणि सैफच्या आहेत. त्या योग्य प्रकारे दोघांची काळजी घेतात, त्यामुळे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याशिवाय तैमूर व जेहची नानी ललिता डिसिल्वाने ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सैफ-करिनाच्या घरात जे अन्न शिजवले जाते तेच जेवण बाकीचे कर्मचारीही जेवतात. येथे कोणाशीही भेदभाव केला जात नाही”.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात, वांद्रे पोलिस स्थानकात चौकशी सुरु, प्रकरणाला नवं वळण
ललिता डिसिल्वा म्हणाली, “मी गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही मुलांची काळजी घेत आहे. सैफ व करिनाच्या सकाळच्या रुटीनमध्ये स्टाफबरोबर जेवणाचा समावेश होतो. प्रत्येकासाठी एक जेवण तयार केले जाते आणि अनेक वेळा आम्ही सगळे एकत्र जेवतो”.