बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सैफच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि घरातून पळून गेला. सध्या सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना शोधण्यासाठी पथकं दाखल केली. सैफच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजमध्ये एका संशयिताचा चेहरादेखील दिसून आला होता. या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिस त्याला आता वांद्रे पोलिस स्थानकात घेऊन गेले आहेत. त्याचा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (saif ali khan update)
सैफवरील हल्ल्यानंतर पोलिसांच्या हाती एक फुटेज लागले होते. यामध्ये आरोपी इमारतीतील पायऱ्यांवरून खाली उतरत जाताना बघायला मिळाला. त्यानंतर त्याचा सर्वत्र तपास सुरु झाला. अखेर ३३ तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता त्या आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे. घरात घुसण्याचे कारण, अभिनेत्यावरील हल्ला याबद्दल त्याला अनेक प्रश्नदेखील विचारण्यात येतील.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Mumbai Police bring one person to Bandra Police station for questioning.
— ANI (@ANI) January 17, 2025
Latest Visuals pic.twitter.com/fuJX9WY7W0
‘आजतक’च्या अहवालानुसार, क्राइम ब्रांचचे डिसीपी दीक्षित यांनी सांगितले की, “संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर याआधीदेखील घरात घुसखोरी केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? असेही अनेक प्रश्न विचारण्यात येणार आहेत”. दरम्यान अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांचीदेखील चौकशी सुरु आहे.
हल्लेखोर फायर एस्केपच्या म्हणजेच शिड्यांचा वापर करुन १२ मजले चढून घरात घुसला. तसेच आतमध्ये ज्या शिड्यांच्या रस्त्याने घरी घुसला होता त्याच रस्त्याने तो पळून गेला. एका आरोपीला फुटेजमध्ये बघण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी अनेक खुलासे केले जात आहेत. सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेबाबत कर्मचारी एलियामाने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत.