शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ९१ वर्षांचे आहेत आदेश बांदेकरांचे वडील, वाढदिवसानिमित्त शेअर केला एकत्रित कुटुंबाचा व्हिडीओ, म्हणाले, “कुटुंबाची शक्ती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar On Father

Video : ९१ वर्षांचे आहेत आदेश बांदेकरांचे वडील, वाढदिवसानिमित्त शेअर केला एकत्रित कुटुंबाचा व्हिडीओ, म्हणाले, "कुटुंबाची शक्ती…"

प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर अनेकदा चर्चेत असतात. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ने महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अशी उपमा त्यांना मिळाली. त्यांची सुस्पष्ट वाणी व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीने साऱ्यांना वेड लावले. संपूर्ण महाराष्ट्रात या आदेश यांचे लाखो चाहते दिवाने आहेत. आदेश यांनी कायमच त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या कलेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासह सोशल मीडियावरही आदेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Aadesh Bandekar On Father)

सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय आदेश बांदेकर हे त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून वेळ देत असतात. कुटुंबीयांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो ते नेहमीच शेअर करताना दिसतात. अशातच आदेश यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदेश यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास पोस्टची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “४-५ सेकंद हृदय बंद आणि…”, प्रशांत दामलेंना आलेला हृदयविकाराचा झटका, ऑपरेशनसाठी गेले अन्…; म्हणाले, “उपचार करताना…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आदेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आमच्या कुटुंबाची शक्ती. पप्पांना ९१व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि सुदृढ दिर्घायुष्यासाठी प्रार्थना”, असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांची खास छायाचित्रे व्हिडीओद्वारे शेअर केली आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच कलाकार मंडळींनीही आदेश यांच्या वडिलांना वाढिदवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – “मोलकरणीच्या मुलांबरोबर तुमची मुलं शिकतील…”, सुप्रसिद्ध मराठी जोडप्याने मुलांना मराठी शाळेत घातल्यामुळे ट्रोल, अभिनेत्री म्हणाली, “शिव्या देतात असं…”

काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकर यांचे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. स्वत: आदेश बांदेकरांनीहा व्हिडीओ सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नव्वदी गाठलेले चंद्रकांत बांदेकर सुस्पष्ट आवाजात त्यांच्या बालपणीची कविता म्हणताना पाहायला मिळाले. आदेश बांदेकर यांनी हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले की, ‘माझे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर हे आमच्या कुटुंबाची उर्जा. ९० व्या वर्षी त्यांच्या शाळेतल्या कविता त्यांना आजही मुखोद्गत. नमस्कार त्यांच्या स्मरणशक्तीला.”

Tags: aadesh bandekar familyAadesh Bandekar Father birthdayAadesh Bandekar On Fatherentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vikrant massey on unprofessional behavior

“रील बनवण्याकडे कलाकारांचं अधिक लक्ष अन्…”, विक्रांत मेस्सीचा संताप, म्हणाला, “बेजबाबदार…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.