अमेरिकन गायिका सेलेना गोमेज सध्या खूप चर्चेत आहे. गायिका असण्याबरोबरच ती अभिनेत्री, निर्माती व उद्योजिकादेखील आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. त्यानंतरही ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिली. अशातच आता तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ती कधीही आई होऊ शकणार नाही याबाबत आता चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता ती सरोगसीच्या सहाय्याने आई होणार किंवा एखादे मूल दत्तक घेणार असल्याचेही समोर आले आहे. (selena gomez being mother)
३२ वर्षीय सेलेना आई होणार नाही असे तिने स्वतः स्पष्ट केले. मात्र यामागचे नेमके कारण काय? कोणत्या कारणामुळे ती आई होणार नाही? याबद्दलचे कारण समोर आले आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, ३२ वर्षाच्या सेलेनाने एका पब्लिकेशनला सांगितले, “मी याआधी असं काही नाही सांगितलं पण मी दुर्भागी आहे. मी माझ्या बाळांना जन्म देऊ शकत नाही. मला अनेक आजार आहे. ज्यामुळे माझ्या व माझ्या बाळांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. यामुळे मला याचे खूप दु:ख होणार आहे”.
सेलेनाला गेल्या अनेक काळापासून ‘ल्युपस’ हा आजार आहे. याबद्दल ती अनेकदा खुलेपणाने भाष्यदेखील करताना दिसते. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळेच मांसपेशीना धोका निर्माण होतो. या आजारमुळेच २०१७ साली तिची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. तिने मेंटल प्रोब्लम बायपोलार डीसॉर्डरबद्दलही सांगितलं होतं.
सेलेनाने आई होण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करणार आहे. तिने सांगितले की, “हे तसं नाही जसा मी विचार केला होता. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझ्याकडे सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याचा पर्याय आहे. या दोन्ही पद्धतीमुळे मी आई होण्याची शक्यता अधिक आहे”. सेलेनाची आई मँडी टिफि यांनादेखील दत्तक घेतले होते. तिने याबद्दल बोलताना सांगितले की, “मी खूप आभारी आहे की असे लोक आहेत ते सरोगसी किंवा दत्तक घेण्यासाठी आजही लोक तयार आहेत. मी या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. हे माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहे. शेवटी हे माझं बाळ असणार आहे”.