सध्या ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून या रिऍलिटी शोने साऱ्यांचं लक्ष वेधलं. अनेक प्रेक्षक मंडळी तसेच कलाकार मंडळी ‘बिग बॉस’वर आपलं मत मांडताना दिसत आहेत. अनेक कलाकार मंडळी पटलेल्या आणि न पटलेल्या स्पर्धकांवर सडेतोड भाष्य करताना दिसतात. अशातच मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर नेहमीच सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करताना दिसतो. सध्या अभिजीत ‘बिग बॉस’मराठीमुळे चर्चेत आहे, नेहमीच तो ‘बिग बॉस’च्या न पटलेल्या आणि पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. अभिजीतने आजवर अनेक मराठी मालिकांमधून चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र अभिजीतला ‘बिग बॉस मराठी’ मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (abhijeet kelkar on bigg boss marathi 5)
‘बिग बॉस मराठी’मध्ये अभिजीत केळकर हा दिसला. सोशल मीडियावर अभिजीत बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा तो त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ट्रोलही होताना दिसतो. अशातच काही दिवसांपासून सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वावर अभिजीत भाष्य करताना दिसतोय. त्याला न पटलेल्या मुद्द्यांवर तो स्पष्टपणे पोस्टही शेअर करत आहे. अशातच आता अभिजीतने शेअर केलेली आणखी एक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू घाणेरड्यासारखंच राहा”, जान्हवी-आर्यामध्ये वाजलं, घरातील ड्युटीवरुन झाली बाचाबाची
वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात येताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच टास्कमध्ये संग्रामने निक्की तांबोळीला तिची जागा दाखवली. इतके दिवस निक्कीचा अरेरावीपणा ‘बिग बॉस’च्या घरात सुरु होता आता मात्र तिला उत्तर द्यायला, तिच्या विरोधात लढायला संग्रामची एण्ट्री झालेली पाहायला मिळतेय. ही संग्रामची एण्ट्री आता अभिजीतला ही आवडली असून निक्कीची वाट लावल्याने त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीतने संग्रामच्या एण्ट्रीनंतर “वाह वाह बिग बॉस, लव्ह यु”, असं म्हटलं. त्यानंतर अभिजीतने आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलं, “बिग बॉस, ये दिल मांगे मोर…खोकल्यावर उपाय केलात, पण नाक अजून फुरफुरतय, आता सर्दी घालवायला ब्रिंग बॅक राखी”, असं म्हटलं. अभिजीत केळकरच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच नेटकऱ्यांनी अभिजीतच्या मताला सहमती दर्शवली आहे