‘बिग बॉस’ हा वादग्रस्त शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’ सुरु असून स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. स्पर्धकांमधील वाद पाहणं रंजक ठरतंय. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये तुफान राडे होताना दिसले. सर्वत्र या शोची चर्चा सुरु आहे. या पर्वातील अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा राडा पाहणं ही उत्सुकतेच ठरत आहे. छोट्या पडद्यावर खलनायिकेची भूमिका साकारत जान्हवीने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यानंतर आता जान्हवी ‘बिग बॉस मराठी’मधून धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.(Bigg Boss Marathi Season 5)
जान्हवीने अगदी पहिल्या दिवसापासून तिचा खेळ दाखवायला सुरुवात केली. घरातील सर्वच स्पर्धकांसह तिचं वाजलं. सुरुवातीला निक्कीची सावली ही तिला म्हटलं गेलं. मात्र निक्की व जान्हवी यांच्या मैत्रीत दुरावा आला आणि त्या दोघी वेगळ्या झाल्या. जान्हवीने घरातील दिग्गज कलाकार पॅडी कांबळे व वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला त्यावेळी संबंध महाराष्ट्र पेटून उठला आणि जान्हवीला योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी करु लागला. त्यानुसार भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीला शिक्षा सुनावत जेलमध्ये टाकलं. त्यानंतर या शिक्षेची भरपाई म्हणून जान्हवीने योग्य पद्धतीने आणि संयम ठेवून खेळण्याचा निर्णय घेतला.
‘बिग बॉस’च्या घरात आता पुन्हा एकदा जान्हवी व आर्यामध्ये राडा झालेला पाहायला मिळतोय. जान्हवी व आर्यामध्ये पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळत असल्याच दिसतंय. घरातील ड्युटी करताना आर्याकडून नीट साफसफाई न झाल्याने जान्हवीचा पारा चढला आणि म्हणूनच जान्हवीने आर्याला टोकलेलं दिसतंय. मात्र आर्यानं मी माझं काम बरोबर केलं आहे ते तुला चुकीचं दिसतंय यांत तुझी चूक आहे, असं म्हणत जान्हवीला उत्तर दिलं आहे. दोघांचं घरातील ड्युटीवरुन वाजलेलं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – अरबाजच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियाला राम राम, असं करण्यामागचं नेमकं कारण तरी काय?
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, आर्य जान्हवीला म्हणते, “तुला बाथरुम साफ करता येत नाही”. तेव्हा जान्हवी म्हणते, “तुला भांडी घासता येत नाहीत”. यावर आर्या म्हणते, “तू स्वतः आधी साफ कर”. यावर जान्हवी रागात बोलते, “मला घाण दिसली तर दिसली आर्या”. यावर आर्याही जान्हवीला उत्तर देत म्हणते की, “तू हे एकटी सांगत आहेस, यावरुन किती चुकीचं वागत आहेस हे कळतंय जान्हवी”. यावर आर्याला जान्हवी म्हणते, “तुला घाणेरड्या सारखं राहायला आवडत तर घाणेरड्यासारखंच राहा”.