बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटात अजून एक अभिनेत्री दिसून आली होती. ही अभिनेत्री म्हणजे गॅल गॅडोट. या अभिनेत्रीने साकारलेले डीसी सुपरहीरो वंडर वुमनची भूमिकादेखील अधिक चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने आता एका चिमुकलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव ओरी असे ठेवले आहे. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती तिने दिली आहे. (gal gadot surgery)
गॅलने याबद्दल सांगितले की, “हे वर्ष खूप आव्हानांचे राहिले आहे. मी कसं काय सगळं शेअर करु? याबद्दल मला नेहमी प्रश्न उपलब्ध राहतो. आता मी माझ्या सगळं स्वीकारण्याचा व शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळं शेअर करुन मी जागरुकता करेन असे वाटत आहे. फेब्रुवारी मी आठ महिन्यांची गरोदर होते. त्यावेळी मला माझ्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे समजले. अनेक महिन्यांपासून खूप डोकं दुखत होतं. यामुळे मी सतत झोपून असायचे. मी एमआरआय केला त्यावेळी मोठं सत्य समजलं. त्यावेळी आपलं आयुष्य किती नाजूक आहे? हे समजलं. मी जीवंत राहावी असंच मला वाटायचं”.
— Gal Gadot (@GalGadot) December 29, 2024
पुढे ती म्हणाली, “आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि काही तासांतच माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. माझी मुलगी ओरीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. आता मी ठीक झाले आहे आणि मला माझं आयुष्य परत मिळालं आहे. मी माझ्या या सगळ्या प्रवासामुळे खूप काही शिकले आहे. सर्वात आधी तुमचं शरीर काय म्हणत आहे ते ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा”.
मिळालेल्या माहितीनुसार, सेरेब्रल वेन्स थ्रोम्बोसिस आजाराचे निदान झाले. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गांठ होण्याची शक्यता असते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ३० किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या लाख महिलांमधील ३ जणींना या रोगाचे निदान होते. गॅलने रियल इस्टेट डेव्हलपर यारोन वर्सनबरोबर लग्न केले. तिला चार मुली आहेत.