बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खेद व्यक्त केला. तसंच सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आणि महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणानंतर मराठी कलाकार प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री विशाखा सुभेदार, लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, तसंच निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्तासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता अभिनेत्री मेघा धाडेनेही प्राजक्ताला व्हिडीओद्वारे पाठिंबा दिला आहे. (megha dhade supported prajakta mali)
या व्हिडीओमध्ये मेघा धाडेने असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी मेघा धाडे. आज तुमच्या पुढे मी माझं मत व्यक्त करायला आले आहे. ते मत व्यक्त करणं ही माझी जबाबदारी समजते. एक स्त्री म्हणून, एक महिला कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजते की, याबद्दल मी बोललं पाहिजे. ते म्हणजे आमची एक जवळची मैत्रीण आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे, जिच्या कामाचं तुम्ही नेहमी कौतुक केलं आहे. जिचं काम, जिची कर्तबगारी अतिशय वाखणण्याजोगी आहे. गेल्या १० वर्षांत जे काही त्या मुलीने स्वतःच्या हिंमत करून दाखवलं आहे. जे तिने स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे. ते कौतुक करण्यासारखं आहे. हेवा वाटण्यासारखं आहे. तिचं नाव म्हणजे प्राजक्ता माळी”.
यापुढे मेघा म्हणाली की, “जे अशी टिपण्णी करतात आणि स्वतःसाठी दुसऱ्यांच्या नावाचा उपयोग करून त्या अब्रुवर शिंतोडे उडवून स्वतःचे उल्लू सिधे करून घेण्याचं जो काही त्यांचा एक केविलववाणा प्रयत्न असतो. तो त्यांना खरंतर त्यांची मानसिकता दाखवतो. कारण खऱ्या आयुष्यात जे पुरुषला जमणार नाही, अशी तू कर्तबगारी दाखवली आहेस. एकहाती कुटुंबाचा आधार घेत जे तू काही केलं आहेस ते प्रत्येकाला जमण्यासारखं नाही. तुझा हेवा वाटण्यासारखंच तुझं काम आहे. त्यामुळे तू सोम्या-गोम्यांच्या फालतू टिपण्यांमुळे व्यथित होऊ नकोस. तुझं काम, तुझं चारित्र्य आणि तू आजवर केलेले कष्ट हे सूर्यप्रकाशासारखे लख्ख आहे”.
यापुढे मेघाने म्हटलं की, “मी त्या राजकारण्यांना सांगू इच्छिते, तुम्ही एका स्त्रीला वेठीशी धरून तिचं नाव घेऊन त्यांचं वर्णन तुम्ही करत होता, ते त्यांचं वर्णन केलं नसून तुम्ही तुमच्या मानसिकतेचं वर्णन केलं आहे. तुमच्या कुचक्या मानसिकतेचं वर्णन तुम्ही केलं आहे. तेव्हा यापुढे कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना हाही विचार करा, तुमच्याही घरात आई-बहिणी आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला बघत आहेस, तुम्ही जे काही बोलत आहात, जी काही कृती करत आहात, जी काही टीका-टिपण्णी करत आहात ते आम्ही सगळे बघत आहोत. यातून तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी नाव बदनाम करण्यापेक्षा स्वत:चीच प्रतिमा डागाळत आहात. कारण तुम्ही नावे घेतलेल्यांनी त्यांची कर्तबगारी दाखवली आहे. ज्यांची नावे घेत आहात त्या काय रस्त्यावर पडलेल्या नाहीत.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी
यानंतर मेघाने असं म्हटलं आहे की, “हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात स्त्रियांना आदर मिळालाच पाहिजे. या पद्धतीची वागणूक ही अतिशय निषेधार्थ आहे. ज्यांनी ज्यांनी प्राजक्ताचे नाव उगाच यात गोवलं आहे. किंवा तिच्याबद्दल जे जे लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. टीआरपी, व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्यासाठी जे जे प्राजक्ताच्या नावाचा वापर करत आहेत, त्या सर्वांचा तीव्र निषेध आहे. तुम्हा सर्वांची कीव येत आहे. एका स्त्रीचं चरित्र हणन करुन तुम्ही तुमचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहात”.
आणखी वाचा – मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
यापुढे मेघाने करुणा मुंडेंबद्दल असं म्हटलं की, “तुमची जी काही भांडणे आहेत ती आपसातली आहेत. त्यात तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी आणण्याची काहीही आवश्यकता नाही. तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबर जे काही भांडण आहे ते त्यांच्याबरोबर निस्तारा. त्यात दुसऱ्यांनची नावे घेऊन त्यांना उगाच बदनाम करु नका. पुराव्याशिवाय त्यांची नावे घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही”.