हॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल असलेल्या ७० वर्षीय क्रिस्टी ली ब्रिंकलेला कर्करोग झाल्याचे समजले आहे. तिच्या या बातमीने तिच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. पण तिचा हा आजार लवकर समजल्याने त्यावर तिने उपचार घेतले व ती बरी झाली आहे. याबद्दल तिने स्वतः खुलासा करत सोशल मिडियावर आपले फोटो शेअर करुन कर्करोग बरा होण्याचा प्रवास सांगितला आहे. तसेच या आजाराशी कशा प्रकारे करता येऊ शकतो याबबद्दलही तिने माहिती दिली आहे. (christie Brinkley Instagram post)
क्रिस्टीने इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर तिने सांगितले की, “मी माझ्या मुलीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे गेले होते. तेव्हा चेहऱ्यावर छोटे छोटे डाग होते. ते डॉक्टरांना दाखवले फाऊंडेशन लावल्यानंतरही हे डाग दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व परिस्थिति समजून घेतली आणि बायोप्सी करण्यास सांगितले. त्यानंतर ‘बेसिल सेल कार्सिनोमा’ कँसर असल्याचे निष्पन्न झाले”.
पुढे तिने लिहिले की, “चेहऱ्याच्या ज्या भागाला कर्करोग झाला आहे तो भाग काढला. त्यानंतर मी डॉक्टरांचे आभार मानले”. तसेच ती म्हणाली की, “कर्करोगापासून वाचण्यासाठी उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा मी याबाबतीत गंभीर नव्हते. पण आता मी माझी जीवनशैली बदलली आहे. माझ्या शरीराच्या उघड्या भागावर SPF 30 चा वापर करते आणि मोठ्या बाह्यांचे कपडेही घालते. तसेच उन्हात जाताना मोठी हॅट घालते”.
तिने तिचे फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया देऊन तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिस्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सुपरमॉडेल राहिली आहे. तिने आतापर्यंत तब्बल ५०० मॅगजिन कव्हरवर दिसली होती. तिने १९८३ मध्ये अभिनयविश्वामध्ये पदार्पण केले होते. तसेच ती ‘नॅशनल लंपुन्स व्हेकेशन’, ‘वेगास व्हेकेशन’ अशा चित्रपटांसह अनेक टीव्ही सिरिज व म्युजिक व्हिडीओमध्ये दिसली होती. ती आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटोही शेअर करत असते आणि चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असते.