हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरी त्याच्या मालिकांबरोबर अनेक कारणांनी चर्चेत येतो. मात्र, आत तो एका चांगल्या कारणासाठी चर्चेत आला आहे. गुरमीतने भररस्त्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका इसमाचा जीव वाचवला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Gurmeet Choudhary gives CPR and save a person)
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, गुरमीत त्याच्या कारने अंधेरीच्या दिशेने जात असताना त्याला रस्त्यावर एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी गुरमीतने त्याच्या कारमधून उतरत तातडीने त्या व्यक्तीला CPR म्हणजे छातीवर दाब देऊन त्याचा जीव वाचवला. त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा हा व्हिडिओ नुकतंच समोर आला असून नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या या कृत्याचे कौतुक करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – “रुग्णालयाच्या डीनला संडास साफ…”, नांदेडमधील ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “जात बघून…”
‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतून गुरमीत चौधरी घराघरात पोहोचला होता. याशिवाय त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. गुरमीतने अभिनेत्री देबिना बॅनर्जीशी लग्न केले असून दोघांना लियांना आणि दिविशा अश्या दोन जुळ्या मुली आहेत. त्याचबरोबर अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो त्याचे अनेक फोटोज व व्हिडिओज चाहत्यांसमोर शेअर करतो. शिवाय, काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याच्या कुटुंबियांसह स्वच्छता अभियानात सहभागी झाला होता, त्याचीदेखील बरीच चर्चा झाली होती.