अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हिना खान लोकप्रिय अभिनेत्रीनपैकी एक आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण या काळात तिला आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तिने सोशल मीडियावर सांगितले की, ती रात्री शांतपणे जेवू शकत नाही आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीला मास्क लावून झोपावे लागत आहे. त्याचप्रमाणे तिची अनेक औषधेही सुरु आहेत. (Heena Khan Health Update)
हिना खानने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत याबाबतची अपडेट शेअर केली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला एक वेळचे जेवण देखील नीट जेवता येत नाही आहे. जेव्हा ती जेवायला बसते तेव्हा ती त्यावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. कारण ती सलग १६ तास शूटिंग करत आहे आणि तिला आरामात बसून जेवायला पुरेसा वेळ मिळत नाही.
याचबरोबर हिनाने असेही सांगितले की, आजकाल तिला रात्रभर मास्क लावून झोपावे लागत आहे. अभिनेत्रीला नीट श्वासही घेता येत नाही. त्यामुळे तिने चाहत्यांना तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. अनेक औषधांचे फोटो शेअर करत हिनाने सांगितले की, ‘ती दिवसाचे १६ तास शूटिंग करत आहे’. हिनाने चार दिवसांपूर्वी ईदचा एक व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अभिनेत्रीने तिची तब्येत बरी नसून घसा खूप दुखत असल्याचेही तिने सांगितले होते.

हा व्हिडीओ अभिनेत्रीने चित्रीकरणाच्या सेटवरुन शेअर केला होता, त्यामुळे ती त्याच लूकमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने या खास लूकसाठी कपाळावर सिंदूर लावला होता. हिना ‘शिंदा शिंदा नो पापा’ या पंजाबी सिनेमात दिसणार आहे. तसेच ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ या हिंदी-इंग्रजी द्विभाषिक चित्रपटातही ती दिसणार आहे, या चित्रपटाची ती सहनिर्माती देखील आहे.