शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

DDLJ च्या शूटदरम्यान पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एकटीनेच करावे लागले अत्यंसंस्कार, अशी वेळ नेमकी का आली?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2024 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Himani Shivpuri  Shared Incident

DDLJ च्या शूटदरम्यान पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एकटीनेच करावे अत्यंसंस्कार

Himani Shivpuri  Shared Incident : ‘कटोरी अम्मा’ या व्यक्तिरेखेने घराघरात लोकप्रियता मिळवलेली हिमानी शिवपुरी घराघरांत लोकप्रिय आहे. ‘हप्पू की उल्टन पलटन’मध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली. पण हिमानी शिवपुरी यांना ‘हम आपके है कौन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हिरो नंबर वन’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांसाठी देखील लक्षात ठेवले जाते. हिमानी शिवपुरी यांचा २४ ऑक्टोबर रोजी ६४ वा वाढदिवस आहे. एकीकडे तिने आपल्या पतीच्या मृत्यूशी दिलेली झुंज यामुळे अभिनेत्रीच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं.

हिमानी शिवपुरीने शाहरुख खान आणि काजोलबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिची अनुपम खेरबरोबरची केमिस्ट्री खूप आवडली होती. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तिने अनुपम खेरसह एक शॉटही केला होता, पण पतीच्या निधनामुळे ती या चित्रीकरणावेळी सहभागी होऊ शकली नाही. हिमानी शिवपुरी यांनी एकदा ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. हिमानीने सांगितले होते की, जेव्हा ती डीडीएलजेचा क्लायमॅक्स शूट करणार होती, तेव्हा तिला फोनवर पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला.

आणखी वाचा – “केसात स्टीलची प्लेट का?”, अक्षय कुमारच्या बायकोची हेअरस्टाइल पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, असं का केलं?

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला असे वाटले की, आता सर्वकाही थांबले आहे. मग ती निर्मात्यांशी बोलली, ज्यांनी अभिनेत्रीला लगेच जाण्याची परवानगी दिली. हिमानी शिवपुरी यांनी सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगवरुन परतल्यानंतर तिने एकट्याने पतीचे अंत्यसंस्कार केले. यानंतर ती स्वतः हरिद्वारला त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी गेली. हिमानी शिवपुरी आजही तो काळ विसरलेल्या नाहीत. अभिनेत्रीच्या मते, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि भयानक काळ होता. मात्र, हिमानीने तिच्या कामावर दुःखाची सावली पडू दिली नाही.

View this post on Instagram

A post shared by Himani Shivpuri (@shivpurihimani)

आणखी वाचा – अविनाश नारकरांनी घेतलं स्वतःचं हक्काचं घर, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला Inside Video, म्हणाल्या, “दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यात…”

आपल्या कारकिर्दीत त्यांनी सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अनुपम खेर आणि कादर खान यांच्यासह अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले. हिमानी शिवपुरी यांचा सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. हिमानी शिवपुरी यांनी सांगितले होते की, एकदा ती फ्लोरिडामध्ये सलमानबरोबर ‘बीवी नंबर वन’चे शूटिंग करत असताना अभिनेता बराच वेळ सेटवर आला नाही. हे पाहून हिमानीला शूटिंग नंतर होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून वेळ आहे असा विचार करुन हिमानी शिवपुरी जवळच्या मॉलमध्ये खरेदीला गेली. मात्र ती परत आल्यावर डेव्हिड धवनने तिच्यावर आरडाओरडा केला. हिमानीने सांगितले होते की, डेविड धवन तिच्यावर रागावला आणि म्हणाला की, “तू इथे शूटिंग किंवा शॉपिंगसाठी आली आहेस का?”.

आणखी वाचा – Video : आदित्य-पारूचा मराठमोळा थाट, दोघांसाठी तयार करण्यात आलं खास गाणं, प्रेम फुलणार

हिमानीच्या म्हणण्यानुसार, तिला रडावेसे वाटले आणि सलमानवर तिला त्यावेळी रागही आला. हिमानी शिवपुरी हिने तो प्रसंग पुन्हा सांगितला जेव्हा ती ‘हम आपके है कौन’ चे शूटिंग करत होती. हिमानीच्या म्हणण्यानुसार, सीनमध्ये सलमान तिला चाची जान म्हणतो. सूरज बडजात्याने त्यांना दृश्य समजावून सांगितले. मात्र सलमानने अचानक हिमानी शिवपुरीला आपल्या मांडीत उचलून ‘आंटी जान’ म्हटले आणि हा चित्रीकरणाचा भाग नव्हता, असेही त्यांनी सांगितले. यावर हिमानी संतापली आणि तिने अभिनेत्याच्या कानशिलात मारली.

Tags: bollywood actresshimani shivpuriHimani Shivpuri  Shared Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla Marathi serial update AJ misses Leela after leaving jahagirdar home

Navri Mile Hitlerla : जहागीरदारांचं घर सोडून गेली लीला, ऐजेंना येत आहे आठवण, पुन्हा परतणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.