Himani Shivpuri Shared Incident : ‘कटोरी अम्मा’ या व्यक्तिरेखेने घराघरात लोकप्रियता मिळवलेली हिमानी शिवपुरी घराघरांत लोकप्रिय आहे. ‘हप्पू की उल्टन पलटन’मध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली. पण हिमानी शिवपुरी यांना ‘हम आपके है कौन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हिरो नंबर वन’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांसाठी देखील लक्षात ठेवले जाते. हिमानी शिवपुरी यांचा २४ ऑक्टोबर रोजी ६४ वा वाढदिवस आहे. एकीकडे तिने आपल्या पतीच्या मृत्यूशी दिलेली झुंज यामुळे अभिनेत्रीच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं.
हिमानी शिवपुरीने शाहरुख खान आणि काजोलबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिची अनुपम खेरबरोबरची केमिस्ट्री खूप आवडली होती. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तिने अनुपम खेरसह एक शॉटही केला होता, पण पतीच्या निधनामुळे ती या चित्रीकरणावेळी सहभागी होऊ शकली नाही. हिमानी शिवपुरी यांनी एकदा ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. हिमानीने सांगितले होते की, जेव्हा ती डीडीएलजेचा क्लायमॅक्स शूट करणार होती, तेव्हा तिला फोनवर पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला.
आणखी वाचा – “केसात स्टीलची प्लेट का?”, अक्षय कुमारच्या बायकोची हेअरस्टाइल पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, असं का केलं?
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला असे वाटले की, आता सर्वकाही थांबले आहे. मग ती निर्मात्यांशी बोलली, ज्यांनी अभिनेत्रीला लगेच जाण्याची परवानगी दिली. हिमानी शिवपुरी यांनी सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगवरुन परतल्यानंतर तिने एकट्याने पतीचे अंत्यसंस्कार केले. यानंतर ती स्वतः हरिद्वारला त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी गेली. हिमानी शिवपुरी आजही तो काळ विसरलेल्या नाहीत. अभिनेत्रीच्या मते, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि भयानक काळ होता. मात्र, हिमानीने तिच्या कामावर दुःखाची सावली पडू दिली नाही.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अनुपम खेर आणि कादर खान यांच्यासह अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले. हिमानी शिवपुरी यांचा सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. हिमानी शिवपुरी यांनी सांगितले होते की, एकदा ती फ्लोरिडामध्ये सलमानबरोबर ‘बीवी नंबर वन’चे शूटिंग करत असताना अभिनेता बराच वेळ सेटवर आला नाही. हे पाहून हिमानीला शूटिंग नंतर होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून वेळ आहे असा विचार करुन हिमानी शिवपुरी जवळच्या मॉलमध्ये खरेदीला गेली. मात्र ती परत आल्यावर डेव्हिड धवनने तिच्यावर आरडाओरडा केला. हिमानीने सांगितले होते की, डेविड धवन तिच्यावर रागावला आणि म्हणाला की, “तू इथे शूटिंग किंवा शॉपिंगसाठी आली आहेस का?”.
आणखी वाचा – Video : आदित्य-पारूचा मराठमोळा थाट, दोघांसाठी तयार करण्यात आलं खास गाणं, प्रेम फुलणार
हिमानीच्या म्हणण्यानुसार, तिला रडावेसे वाटले आणि सलमानवर तिला त्यावेळी रागही आला. हिमानी शिवपुरी हिने तो प्रसंग पुन्हा सांगितला जेव्हा ती ‘हम आपके है कौन’ चे शूटिंग करत होती. हिमानीच्या म्हणण्यानुसार, सीनमध्ये सलमान तिला चाची जान म्हणतो. सूरज बडजात्याने त्यांना दृश्य समजावून सांगितले. मात्र सलमानने अचानक हिमानी शिवपुरीला आपल्या मांडीत उचलून ‘आंटी जान’ म्हटले आणि हा चित्रीकरणाचा भाग नव्हता, असेही त्यांनी सांगितले. यावर हिमानी संतापली आणि तिने अभिनेत्याच्या कानशिलात मारली.