समाजात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडतात या गोष्टींवर प्रत्येकजण आपल्या प्रतिक्रिया देखील देत असतो. कर्तव्यदक्ष नागरिकांप्रमाणे आजूबाजूच्या वाईट घटनांवर आपलं मत मांडणं, प्रतिक्रिया देणं हे काम अनेक कलाकार देखील प्रामाणिकपणे करत असतात. सध्या अशाच एका घटनेवर संताप व्यक्त करत अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक पोस्ट शेअर केली आहे. गोमांस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या एका व्हायरल व्हिडीओवर हेमंतने संताप व्यक्त केला आहे . ट्विटरवरून हेमंतने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हेमंतने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रेनमधून गोमांस घेऊन जाताना दिसत आहे. ट्रेन मधील इतर प्रवाशांनी या संशयावरून संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. (hemant dhome)
या सर्व घटनेबाबत पोस्ट शेअर करत हेमंत म्हणाला “नका रे नका… आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका! विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र! आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाहीय… कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का?” असा प्रश्न सरकारला विचारला आहे. या पोस्टमध्ये हेमंत ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत “आपण तरी कठोर कारवाई करा! बाकी लोकांकडून अपेक्षा नाहीत!” असं आवाहन देखील केलं आहे.
नका रे नका… आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) August 31, 2024
विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र!
आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाहीय…
कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? @DGPMaharashtra@AjitPawarSpeaks आपण तरी कठोर कारवाई करा! बाकी लोकांकडून अपेक्षा नाहीत! https://t.co/aFDYN0wvGM
हे देखील वाचा- जंगी सेलिब्रेशन, पार्टी, धमाल अन्…; अरुण कदमांच्या नातवाला एक वर्ष पूर्ण होताच एकत्र आलं संपूर्ण कुटुंब, साधेपणाने वेधलं लक्ष
हेमंतच्या या पोस्टवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील दखल घेण्यात आली आहे. “इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, आणि अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आश्वासन देण्यात आले आहे. (hemant dhome)
इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 1, 2024
हे देखील वाचा- गणपतीचे दिवस जवळ येताच रडू लागली अंकिता वालावलकर, ‘बिग बॉस’ने समजावलं, म्हणाली, “माझ्याशिवाय कसं होईल?…”
अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने यापूर्वीही अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. हेमंतच्या या पोस्टची दखल घेतली जाणार का? सरकार कडून या घटनेवर योग्य ती कारवाई केली जाणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.