Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेत असलेल्या स्पर्धकांमध्ये दोन नाव अग्रगण्य आहेत ते म्हणजे निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दोघींमधील मैत्रीचा बॉण्डही पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. निक्की जशी वागेल तसं जान्हवीही वागू लागली. मात्र भाऊच्या धक्क्यावर निक्कीने टीम A मधून एक्झिट घेतली आणि जान्हवी विरोधात खेळ खेळू लागली.
जान्हवीनेही मराठीतील दिग्गज कलाकार मंडळींचा अपमान केला. यावरुन रितेश देशमुखने जान्हवीची चांगली शाळा घेतली. काही दिवसांपूर्वी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकीर्दीवरुन केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. साऱ्या महाराष्ट्रातून जान्हवीला ट्रोल करण्यात आलं आणि त्यानंतर रितेश देशमुखने तिला आठवडाभर जेलमध्ये बंद केले. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने टास्क दरम्यान आदळआपट केली, त्यावरुन भाऊच्या धक्क्यावर शाळा न घेता उलट त्याच कौतुक केलं हा अन्याय आहे म्हणत जान्हवीच्या जावेने म्हणजेच संध्या किल्लेकर यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
जान्हवीच्या जावेने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा देत तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “घरातील वस्तुंची आदळाआपट करुन ‘बिग बॉस’च्या घराचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. टास्कमध्ये आक्रमकता दाखवून शारीरिक हिंसा होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. घरातीलच एका सदस्याला शिवीगाळ केल्यानंतर Bip Bip ऐकु येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करुनही घरातील प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगुनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही. हे जान्हवीसाठी खरंच खूप अन्यायकारक आहे. घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे”.
आणखी वाचा – गणपतीचे दिवस जवळ येताच रडू लागली अंकिता वालावलकर, ‘बिग बॉस’ने समजावलं, म्हणाली, “माझ्याशिवाय कसं होईल?…”
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “एक आठवडा शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान मिळालं नाही पण तुझ्या खंबीर, खऱ्या, स्वतंत्र खेळाने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळव. आमचा नेहमीच तुला पाठिंबा आहे. जान्हवी समर्थक”. सदर पोस्टखाली जान्हवीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दर्शविला आहे.