Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरु झाल्यापासून या शोमधील स्पर्धक सतत चर्चेत असतात. आता या शोला महिना उलटून गेला आहे. या काळात घरात अनेक वाद निर्माण झाले तर बरीच मैत्रीपूर्ण अशी नाती सुद्धा तयार झालेली पाहायला मिळाली. घरातील नेहमीच चर्चेत असणार पात्र म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. यंदा या घरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. कोकण व मालवणी भाषेवरील प्रेम ती आशयघन कंटेन्ट मार्फत चाहत्यांच्या समोर मांडताना दिसते.
अंकिता ही मूळची कोकणातील आहे. सध्या कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुंबईकर गणेशोत्सवासाठी कोकणात जायला सज्ज झाले आहेत. अंकिता ही सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी अंकिताला जाता येणार नाही आहे. त्यामुळे यंदा गणपती उत्सवासाठी अंकिता खूप उत्सुक असल्याची पाहायला मिळत आहे. असं असलं तरी गणपतीत घरी जाता येणार नसल्याने ती भावुक झालेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – Video : जुन्नरमधील नम्रता संभेरावच्या घरी जागरण गोंधळ, संबळवर नवऱ्यासह धरला ठेका, साधेपणाचं कौतुक
‘बिग बॉस’ अंकिताला सांगतात, “कालचा दिवस खूप कठीण होता. प्रत्येक दिवस वेगळा आहे. प्रत्येक आठवडा वेगळा आहे. आज फक्त आजचा विचार करा. उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही. आणि जे माहित नाही त्याला घाबरायची गरज नाही. मला माहित आहे गणपती येतोय”. यावर अंकिता रडते, आणि म्हणते, “मी कोकणातील आहे समजून घ्या”. पुढे ‘बिग बॉस म्हणतात, “अंकिता हे जे दिवस आपल्याला कठीण वाटतात. पुढे जाऊन गणपतीत आपण हेच किस्से आपल्या कुटुंबाला व मित्र मैत्रिणींना सांगाल”. यावर अंकिता रडत म्हणते, “माझ्याशिवाय गणपती कसे होईल याचं टेंशन येत”. यावर ‘बिग बॉस’ अंकिताची समजूत काढत, “सगळं मस्त होईल. आपलं इकडची काळजी करा”, असं म्हणतात.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?
यापूर्वीही अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी त्याच्याशी गणपती विषयी चर्चा केली. अंकिताच्या बॉयफ्रेंडच्या घरी ७ दिवसांचा गणपती येतो. तर तिच्याही घरी सातच दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिला सुचवलं की, तिने तिच्या घरचा गणपती ९ दिवसांचा करावा म्हणजे शेवटचे दोन दिवस ती आपल्या माहेरी जाऊन गणपतीचं सर्व काही करु शकेल. पण अंकिताला हा निर्णय योग्य वाटत नव्हता. यावर उपाय म्हणून गणपतीची पूर्वतयारी झाल्यावर सासरी दोन दिवस गणेशोत्सव साजरा करेल आणि नंतर पुन्हा आपल्या माहेरी आपल्या गणपतीचं पाहायला येईल, असं तिने ठरवलं.