मराठी मनोरंजन सृष्टीतील अष्टपैलू कलावंत म्हणून हेमंत ढोमे याच्याकडे नेहमीच पाहिला जातो. हेमंत उत्तम अभिनेता असण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शकसुद्धा आहे. महाविद्यालयीन काळापासूनच हेमंतने अनेक नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यातूनच तो आज उत्तम अभिनेता, लेखक व दिग्दर्शक घडत गेला. हेमंतने नाटक, चित्रपट व छोटा पडदा या तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाची झलक तर दाखवलीच आहे. शिवाय ‘फु बाई फु’ या कॉमेडी शोमध्ये त्याचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्याचबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही हेमंतने चांगलाच जम बसवला असून त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Hemant Dhome)
अभिनेता हेमंत ढोमे नेहमीच विविध मुद्द्यांवरून सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतो. त्याच्या या मतावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हेमंत ढोमे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते त्याच्या ट्विटने.
ट्विटमध्ये काय म्हणाला हेमंत ढोमे ? (Hemant Dhome angry on Mumbai-Goa Highway Condition)
हेमंत ढोमेने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर काही फोटोज शेअर करत एक ट्विट केलं आहे. ज्यात त्याने मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेवर संताप व्यक्त केला आहे. हेमंत ढोमे या ट्विटमध्ये म्हणतो, “चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!”
हे देखील वाचा – पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नितीन गडकरींवर संताप, म्हणाली, “टॅग करुनही…”
चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) August 11, 2023
आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!!
भीषण! pic.twitter.com/FlLJjYL8LR
त्याच्या या ट्विटवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनाही हेमंत प्रतिसाद देताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने एक व्हिडिओ शेअर केला, त्याला उत्तर देताना म्हणतो, “चूक एस.टी. ड्रायवर ची आहे… मी म्हणतो त्यांनी तळ्यात का घातली गाडी?”. तर आणखी एका नेटकऱ्याने “विद्यमान आमदारांनी एका वर्षात महामार्ग पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे” अशी कमेंट केली. त्यावर हेमंत म्हणाला, “अशा अनेक शपथा, अनेक वचनं गेली अनेक वर्ष आपण ऐकतोच आहोत! कुठल्याही पक्षाने, कुठल्याही मंत्र्याने, आमदाराने… काहीही केलेलं नाही!”
हे देखील वाचा – रस्त्यांवरील दुरावस्थेवर बोलली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम गौरी किरण, म्हणाली, “स्वर्गात जायचा रस्ता…”
याआधी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी किरण हिनेही मुंबई-गोवा महामार्गावरील दुरावस्थेवर संताप व्यक्त केला आहे.