देशातला प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर नेहमीच व्यक्तच होतो. मग तो सर्वसामान्य घरातला असो किंवा एखादा कलाकार. मराठी मनोरंजन विश्वात बरेचसे असे कलाकार आहेत, जे आपल्या आसपास घडणाऱ्या विविध घडामोडींवर आणि देशातील परिस्थितीवर मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. राजकारण, सामाजिक व अन्य मुद्द्यांवर कलाकार आपलं मत मांडतात. त्यांच्या मतांना चाहतेसह नेटकरीही प्रतिसाद देत त्यावर व्यक्त होताना दिसतात.
सध्या पावसाळा सुरु आहे. आणि पावसाळा म्हटलं की, रस्त्यांवर खड्डे नेहमीच दिसतात. पण खड्ड्यांच्या मुद्द्यांवर अनेक जण दुर्लक्ष करत असल्याने कोणी यावर फारसं काही बोलत नाही. मात्र आता यावर काही कलाकार उघडपणे बोलताना दिसत असून छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री गौरी किरण हिने एक रील शेअर करत या कोकणातल्या रस्त्यांची दुर्दशा दाखवली. (smb fame gauri kiran)
पहा काय म्हणते गौरी किरण रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल (gauri kiran on road potholes)
अभिनेत्री गौरी किरण कोकणच्या दिशेने जात असताना तिला मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांवर खड्डे दिसून येतात. यावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर एक रील शेअर केला आहे, ज्यात ती महामार्गावरील रस्त्यांची परिस्थिती दाखवते. शेअर केलेल्या या रीलमध्ये गौरी रस्त्याच्या कडेला उभी राहते आणि म्हणते, “कोकण हा खरंच स्वर्ग आहे. त्यामुळे जर स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो, तितकाच कोकणात जायचा सुद्धा कठीण आहे.” तर कॅप्शनमध्ये “Mumbai Goa highway ????” असा उल्लेख केलेला आहे. (gauri kiran on road potholes)
गौरीच्या या रीलवर नेटकरी व्यक्त होत असून एका नेटकरीने यावर “मराठी कलाकार सुद्धा अश्या सामाजिक प्रश्नवर बोलतात तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विकास होईल कारण सरकारी प्रतिनिधी या गोष्टींवर लक्षच घालत नाही . कलाकरांच्या मदतीने तरी सामान्य माणसाला न्याय मिळेल”, असं म्हणत अभिनेत्रींचे कौतुक केले. अभिनेत्री गौरी किरण ही ‘पुष्पक विमान’ या चित्रपटासह ‘सुंदरा मनामध्ये भरली’ सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली. (gauri kiran on road potholes)
