टोल प्रकरणावरून काही दिवसांपासून अभिनेत्री ऋजुता देशमुख चर्चेत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना आलेला अनुभव ऋजुताने सोशल मीडियावरून शेअर केला. ३१ जुलै रोजी प्रवासादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टोल बाबतचा एक अनुभव ऋजुताला आला. जास्त टोल त्यांच्या कडून आकारण्यात आला असल्याचं सांगणारा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून शेअर केला. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत ऋजुताला पाठिंबा दिला आहे. (Rujuta Deshmukh on Nitin Gadkari)
जास्त टोल आकारण्यावरून ऋजुताने एक व्हिडिओ शेअर केलं त्याखाली तिने “तुम्हाला काय वाटतं? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते. कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया ! खरचं असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?” असं कॅप्शन देत शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टॅगदेखील केलं होत.
पाहा ऋजुता का संतापलीय नितीन गडकरी यांच्यावर (Rujuta Deshmukh on Nitin Gadkari)
ऋजुताने शेअर केलेल्या व्हिडीओखली अनेक नेटकऱ्यानी कमेंट केल्या आहेत. यातच एका युजरलाही असाच अनुभव आल्याचं त्याने ऋजुताच्या पोस्टखाली म्हटलं. ऋजुताने ही कमेंट स्टोरीला रिपोस्ट केली आहे. आणि त्यासोबत म्हटलंय की, “अनेकांना असे विविध अनुभव आले आहेत. नितीन गडकरी यांना टॅग करून काही उपयोग झाला नाही, तरी पुन्हा टॅग करत आहे”. असं म्हणत तिने स्टोरी पोस्ट केली आहे.
ऋजुताचा हा टोल प्रकरणाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरला आहे. तर मुंबई-पुणे प्रवास करताना अनेकांना असा अनुभव आला असल्याचंही ऋजुताच्या व्हिडिओनंतर अनेकांनी मान्य केलं आहे.