यंदाच्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यानंतर आता या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या सादरीकरणाचा समारंभ १७ ऑक्टोबर, मंगळवार रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल. या सोहळ्यासाठी अनेक चित्रपट दिग्गज दिल्लीत दाखल झाले आहेत. (69th National Film Awards)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सादरीकरण समारंभास हजेरी लावण्याकरिता रवाना झालेले अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी हे कलाकार सोमवारी दिल्ली विमानतळावर दिसले. तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, करण जोहर, अपूर्व मेहता मंगळवारी सकाळी खाजगी विमानांनी कलिना विमानतळावरून राष्ट्रीय राजधानीकडे रवाना झाले.
आणखी वाचा – Video : कारवर उभं राहून सई ताम्हणकरचा भररस्त्यात धम्माल डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल
हा सोहळा दुपारी १.३० वाजता सुरू होणार असून डीडी नॅशनल आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व प्रसारण करण्यात येईल. दूरदर्शन नॅशनलच्या सोशल मीडिया पेजवरून याबाबतची अधिकृत माहिती पोस्ट करण्यात आली आहे. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रमुख श्रेणीतील विजेत्यांनी बाजी मारली. विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :
#Celebrate talent and excellence at the 69th National Film Awards at Vigyan Bhawan, New Delhi. Join us live on #DDNational, Tuesday, October 17th, at 1:30 PM.
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) October 17, 2023
Watch here: https://t.co/uVykayVLFM… #NFA | #NFAWithDD | @MIB_India | @nfdcindia | @ianuragthakur pic.twitter.com/K4PVd0l4mW
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रॉकेट्री
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल महाजन, गोदावरी
उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: RRR
राष्ट्रीय एकात्मता: द काश्मीर फाइल्सवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अल्लू अर्जुन, पुष्पा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी आणि क्रिती सॅनन, मिमी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गाणी): देवी श्री प्रसाद, पुष्पा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत): एमएम कीरावानी, आरआरआर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी, मिमी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी, द काश्मीर फाइल्स
विशेष ज्युरी पुरस्कार: शेरशाह
२०२१ मध्ये CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून प्रमाणपत्र प्राप्त ६९व्या राष्ट्रीय चित्रपटांसाठी पुरस्कार प्रदान केले जात आहेत.