महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम हा आज जगभरात मोठ्या उत्साहाने पाहिला जातो. अनेक वेगवेगळ्या विषयांवर विनोदी पद्धतीने केलं जाणारं सादरीकरण हे प्रेक्षकांच्या देखील चांगलंच पसंतीस उतरलेलं पाहायला मिळतंय. कोरोना काळात देखील प्रेक्षकांना हास्यजत्रा हे मनोरंजनाचं एक उत्तम साधन होतं. महाराष्ट्राच्या या हास्यजत्रेत अनेक कलाकार गेल्या अनेक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या कलाकारांच्या यादीत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अरुण कदम, प्रभाकर मोरे, गौरव मोरे, शिवली परब, यांसह अन्य कलाकारांचा देखील समावेश आहे.(samir choughule Shivali Parab)
वर्षभर नवीन नवनवीन स्किट्स सादरकेल्यानंतर अन्य सर्व कलाकार काही वेळासाठी हास्यजत्रेतून ब्रेकघेऊन परदेशात आपल्या शोज साठी गेले होते. परदेशात देखील आपल्या विनोदाची जादू पसरवल्यानंतर हे कलाकार पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी परतले. त्यानिमित्त सर्व कलाकारांनी इट्स मज्जासोबत आपले अनुभव, किस्से शेअर केले आहेत. या किस्स्यांमध्ये अभिनेता समीर चौघुलेने सेटवरील कलाकारांची पोलखोल देखील केलेली पाहायला मिळाली. या मध्ये अभिनेत्री शिवली परब बद्दल सांगताना समीरने “शिवाली २ किलो बिर्याणी खाऊ शकते ते माझे फम्बल ती लिहून ठेवते” असे अनेक किस्से सांगून शिवालीची पोलखोल केली.(maharashtrachi hasya jatra usa tour)
हे देखील वाचा- आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणतो, “आताच माझं…”
समीरला या मुलाखतीमध्ये सेटवर सगळ्यात जास्त खादाड कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत समीर म्हणाला हास्यजत्रेच्या सेटवर सगळ्यात जास्त खादाड ही शिवाली परब आहे. तिच्या समोर बिर्याणी हा पदार्थ आला तर ती एकावेळी तब्बल २ किलो बिर्याणी खाऊ शकते. तसेच पुढे समीरला सेटवर सगळ्यात जास्त नखरे कोणाचे असतात असा देखील प्रश्न विचारण्यात आला यावर देखील समीरने शिवालीच नाव घेत तिच्या नखऱ्यांचा एक किस्सा सांगितला समीर म्हणाला “सेटवर शिवाली सग्ळ्यांना सांगते मला महाराष्ट्राची क्रश म्हणा परंतु आम्हाला ती मुलगाच वाटते ज्या प्रकरे ती आमच्या सगळ्यांसोबत वागते”.(maharashtrachi hasya jatra 2023)
हे देखील वाचा- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं नशिब उजळलं, हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फोटो व्हायरल
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील शिवाली परब आणि समीर चौघुले यांचं स्किट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल होतं. (samir choughule Shivali Parab)