Harshvardhan Rane romantic roles : अभिनेता हर्षवर्धन राणेला ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटात एक उत्कट प्रेमकथा दाखवण्यात आली होती. आता तो पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तो ‘एक दीवाने की दीवानियत’ या त्याच्या आगामी आणि प्रदर्शित झालेल्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सध्या तुफान धुमाकूळ घालत आहे. हर्षवर्धनने नुकताच खुलासा केला की, त्याला रोमँटिक भूमिका करायला का आवडतात.
हर्षवर्धन म्हणाला, “मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळी पाच-सहा साथीदारांसह पाहिले. त्यांचे प्रेम, नाते आणि भावनिक बंध मी पाहिले आहेत. मी लहान असताना त्यांना पाहिल्याचे मला आठवते, पण मी त्यांना कधीच अस्वस्थ वाटू दिले नाही कारण त्यांना काय वाटते, ते काय वागतात हे मला समजले होते”. हर्षवर्धन राणे यांनी सोनम बाजवासोबत ‘एक दीवाने की दीवानियत’मध्ये काम करतानाचा अनुभव सांगितला.
आणखी वाचा – प्रीतमचा अपघात, दिशाचा नवा डाव पारू-आदित्य पलटवणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट
तो म्हणाला की, “सोनम एक यशस्वी व्यावसायिक नायिका तर आहेच, पण ती एक सशक्त अभिनेत्रीही आहे. ती शांत राहूनही सीन करु शकते”. हर्षवर्धन राणे याने २०१६ मध्ये ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन होती. त्यावेळी या चित्रपटाने विशेष कामगिरी केली नव्हती. पण चित्रपटातील गाणी खूप गाजली.
आणखी वाचा – लग्नाच्या १३ वर्षांनी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीचे केले थाटामाटात डोहाळ जेवण, व्हिडीओ समोर
पण २०२५ मध्ये जेव्हा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. या चित्रपटाने ४१ कोटींची कमाई केली होती. हर्षवर्धन आणि मावराची केमिस्ट्रीही साऱ्यांना खूप आवडली होती. ‘एक दीवाने की दीवानियत’बद्दल सांगायचे तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. या चित्रपटात सोनम बाजवा मुख्य भूमिकेत आहे. हर्षवर्धन चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. शाद रंधावा, सचिन खेडकर या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.





