शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याला मातृशोक, आईबरोबरच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत भावुक, म्हणाला, “आठवण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 25, 2025 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tanmay vekarias mother passed away

'तारक मेहता…' फेम अभिनेत्याला मातृशोक, आईबरोबरच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत भावुक, म्हणाला, "आठवण…"

 tanmay vekarias mother passed away : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध टीव्ही शो फेम अभिनेता तन्मय वेकारिया म्हणजेच बाघाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाघाच्या आईचे निधन झाले आहे. अभिनेत्याने एक भावनिक पोस्ट शेअर करुन ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आईच्या निधनानंतर बाघाची भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये त्याच्या आईचे काही फोटो शेअर करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्टसोबत एक भावनिक चिठ्ठीही लिहिली आहे. आता चाहते तन्मयला प्रोत्साहन देत आहेत आणि त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम तन्मय वेकारियाच्या आईचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. अभिनेत्याच्या व्हायरल झालेल्या भावनिक पोस्टमध्ये अभिनेत्याने आपल्या आईच्या फोटोंचा व्हिडीओ बनवला असून या व्हिडीओवर ‘चिठी ना कोई संदेश’ हे गाणे बॅकग्राउंडला लावले आहे. सोशल मीडियावर बाघाचा हा व्हिडीओ पाहून सगळेच भावूक झाले. त्याचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करुन त्याला प्रोत्साहन देत आहेत.

आणखी वाचा – प्रीतमचा अपघात, दिशाचा नवा डाव पारू-आदित्य पलटवणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Tanmay Vekaria official (@tanmayvekariaofficial)

बाघा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. तन्मयने लिहिले की, “दु:खाची गोष्ट ही आहे की, तुम्ही तिला फक्त चित्रांमध्ये पाहू शकता आणि तिला तुमच्या हृदयात अनुभवू शकता, तुम्ही तिला मिठी मारु शकत नाही किंवा पुन्हा कधीही समोर पाहू शकत नाही. मला माझ्या आईची आठवण येते, मला माहित आहे की, तू तिथे सर्वोत्तम ठिकाणी आहेस”. चाहत्यांसोबतच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम कोमल भाभी म्हणजेच अंबिका हिने तन्मय वेकरियाच्या व्हायरल पोस्टवर हार्ट इमोजी पाठवला आहे. यासोबतच अभिनेत्री डेलनाज इराणीनेही तन्मयच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – “पाच-सहा जोडीदारांसह वडिलांना पाहिले”, बॉलिवूड अभिनेत्याचा रोमँटिक भूमिकांबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला…

तन्मय वेकारिया ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तन्मयने त्याचे बाघा हे पात्र प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध केले. या मालिकेतील बाघा ही व्यक्तिरेखा एका साध्या व्यक्तीची आहे ज्याची उभी राहण्याची पद्धत खूपच मजेदार आहे. आणि त्याचं बोलणं साऱ्यांनाच आवडतं.

Tags: Taarak mehata ka ooltah chashamahtanmay vekariatelevision actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
actress Isabelle Tate passes away

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे वयाच्या २३व्या वर्षी निधन, 'या' गंभीर आजाराने गमावला जीव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.