अखेर ‘राणादाचं’ पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

hardeek joshi
hardeek joshi

मराठी टेलिव्हिजन विश्वात सर्वात लोकप्रिय असलेलं कपल म्हणजे राणादा आणि पाठक बाई. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली असली तरी या मालिकेची चर्चा आजही रंगताना पाहायला मिळतेय. या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई यांच्या केमिस्ट्रीला तर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले होते. तर या जोडीने म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी  २ डिसेंबर रोजी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्यांचे चाहते खूप खुश झाले होते. (hardeek joshi)

बराच काळ टेलिव्हिजनवर पाहायला न मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा त्यांना एकत्र टेलिव्हिजनवर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. लग्नानंतर हे दोघे कोणत्या आगामी प्रोजेक्ट मध्ये झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अश्यातच अभिनेता हार्दिक जोशी याने टेलिव्हिजन वर कमबॅक करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.

====

हे देखील वाचा- जीव माझा गुंतला मधील अभिनेत्याचा अपघात ‘जीव पेक्षा मोठं काही नाही’ म्हणत दिली माहिती

====

सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत हार्दिक जोशी झळकणार आहे. सुटाबुटात असलेल्या हार्दिकच्या डोळ्यांवर गॉगल पाहायला मिळतोय. सुंदरीच्या ट्रेनिंगसाठी आयएएस अजिंक्य शिंदेची एन्ट्री होणार आहे. त्याचा हा रावडी लूक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज झाला आहे. अजिंक्य शिंदे ही भूमिका हार्दिक साकारताना दिसणार आहे. त्याच्या या नव्या भूमिकेत  हार्दिक जोशी रफ अँड टफ अंदाजात दिसतोय. ‘सुंदरी’ मालिका सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता पाहायला मिळतेय.

haardek joshi sun marathi

काय आहे नवीन भूमिका

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने हार्दिकला घराघरांत पोहचवलं. याच मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान अक्षया आणि हार्दिक मध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याच्या फोटोंनी तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होत्या. त्यांच्या लग्नातील फोटो त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पसरवले होते.(hardeek joshi)

अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाला नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. तर सिनेविश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहून चारचाँद लावले. साखरपुड्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर दोघांवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला. या सगळ्यांनंतर आता हार्दिकने मालिकाविश्वात कमबॅक केलंय. हार्दिकला सुंदरी मालिकेतील आयएएस अजिंक्य शिंदेच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
post office ughad ahe wrap up
Read More

‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ मालिकेची wrapup party दणक्यात साजरी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर चांगलाच कल्ला केला. गेल्या गेल्या…
Sankarshan Karhade Troll
Read More

नारळ वाढवताना बूट न काढल्यामुळे संकर्षण ट्रोल पण सामंजस्याने दिलं ट्रॉलिंगला उत्तर

सध्याच्या परिस्थतीत कलाकार जेवढा रुपरी पडद्यावर जेवढा गाजतो कधी कधी लहान गोष्टींवरून ट्रॉल ही केला जातो. कधी या…
siddharth jadhav emotional post
Read More

‘भारावलेल्या डोळ्यांनी त्यांनी…’ असे म्हणत सिद्धार्थ जाधवची भावुक पोस्ट

असा नट होणे नाही असे म्हणणाऱ्या सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. झी चित्र गौरव कार्यक्रमात…
amol kolhe challenge
Read More

पंचेचाळीस मिनिटात १०८ सूर्यनमस्कार,कोल्हेंचं स्वतःला चॅलेंज

ऐतिहासिक चित्रपट वा मालिका म्हटलं की आधी नाव सुचत ते म्हणजे अभिनेते अमोल कोल्हे यांचं. ऐतिहासिक भूमिका अगदी…
Aai Kuthe Kay karte episode
Read More

अनिरुद्धला मिळालं अरुंधतीसोबत वाद घालण्यासाठी नवं कारण

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरून प्रेम करतात.…