‘दुनिया डोक्यावर घेणार हाय रं….’ ओंकार ने सांगितला व्हायरल गाण्यांमागचा किस्सा

Onkar Bhojane song
Onkar Bhojane song

मंडळी कलाकार सोशल मीडिया वर असतात म्हणजे फक्त तेच कलाकार प्रसिद्ध असतात असं नाही. कलाकारांची कला त्यांना कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर नसताना प्रसिद्धी मिळवून देत असते. सोशल मीडियावर कोणतही अकॉउंट नसलेला तरीही प्रेक्षकांच्या कौतुकाचा भाग ठरलेला असाच एक अभिनेता आहे जो सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. तो अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.(Onkar Bhojane song)

एकांकिका, नाटकांमधून करिअरची सुरुवात करणारा ओंकार आज दर्जेदार शोज आणि चित्रपटांचा महत्वाचा भाग ठरत आहे. विशेष करून ओंकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील त्याच्या अफलातून अभिनयामुळे. हास्यजत्रेतील त्याच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तर नुकताच ओंकारची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजला.

====

हे देखील वाचा – ‘लग्नाला यायला जमलं नाही म्हणून भोजाने थेट..’ ओंकार भोजनेचं वनिताला खास सरप्राईझ

====

ओंकार भोजनेची विनोदशैली जरी हटके असली तरी त्याच्या कडे अजून एक अशी कला आहे जी प्रेक्षकांना पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करते ती म्हणजे ओंकार ने लिहिलेली कविता आणि त्याच सादरीकरण. सध्या ओंकारची कविता, गाणं सगळीकडे चांगलंच गाजतंय. या पूर्वी ही त्याने हे गाणं ऐकवलं आहे. जे प्रेक्षकांसहीत अनेक इतर कलाकारांनाही तितकंच आवडत. त्याने इट्स मज्जा ला दिलेल्या एका मुलाखतीती त्याने ही गाणी कुठे आणि लिहिली हे सांगितलं आहे.(Onkar Bhojane song)

संघर्षाच्या काळात निर्माण झाली गाणी(Onkar Bhojane song)

ओंकारने मुलाखतीती संगितिल कि नाटकाच्या एकांकिकेसाठी तो ही गाणी लिहायचा काही निवडली जायची काही माझ्याकडे तशीच साठून राहायची. संघर्षांच्या काळात जेव्हा ओंकार ला विचारण्यात आलं कि या सगळ्या वाटचालीकडे तुम्ही कसे बघता तेव्हा त्याने हे गाणी ऐकून दाखवलं होत. त्याने गायलेलं ‘दुनिया डोक्यावर घेणारं हाय र’ हे गाणं आजही चांगलंच व्हायरल होत आहे. स्ट्रगल करताना कस जगावं, मेहनत का करावी या बद्दल प्रोत्सहन देणारं ओंकार भोजनेच हे गाणं तरुण पिढीला प्रेरणा देणारं ठरतंय.

काही महिन्यांपूर्वी हास्य जत्रा सोडून ओंकार भोजने झी मराठी वरील फु बाई फु या कार्यक्रमात झळकला होता. परंतु हा शो देखील जास्त काळ न चालू राहिल्याने आता ओंकारला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहे. हास्य जत्रा सोडली तरीही त्याची सहकलाकारांशी, विनोदाशी, अभिनयही असलेली नाळ अजूनही तशीच जोडून आहे.(Onkar Bhojane song)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Struggle Story Shreyas Talpade
Read More

कॅमेरामॅन ने ‘तू पनवती आहेस’ म्हणून हिणवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव!

मराठी तसेच हिंदी चित्रपटातून नावारूपाला आलेला अभिनेता श्रेयस तळपदे आपल्याला “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेत दिसला होता.…
Ashok Saraf Laxmikant Berde
Read More

अशोक मामांना जीवनगौरव, पण लक्ष्याच्या आठवणीत फॅन्स भावुक

असा नट होणे नाही म्हणणारं दिग्गज सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांना झी चित्र गौरव…
Aishwarya Rai Rishi Kapoor
Read More

म्हणून मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ओरडले होते ऋषी कपूर…साधेपणानं राहणं ठरलं होत कारण

मनोरंजनाचा पडदा म्हणजेच रुपेरी पडदा हा विविध कलाकारांच्या कलेचा सन्मान नेहमी करत असतो. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं…
girgaon shobhayatra
Read More

गिरगांवच्या शोभायात्रेला कलाकारांची मांदियाळी; त्यांचा पारंपारिक लूक ठरतोय लक्षवेधी

संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नव वर्षाचा सोहळा दिमाखात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा गुढी…
salim khan amitabh bacchan
Read More

अमिताभ बच्चन यांच्यामुळे या दोन जिवलग मित्रांमध्ये पडली फूट

चेहऱ्यावरची गंभीरता पाहून व्यक्ती रागीट वाटणं स्वाभाविकच आहे. मात्र प्रत्यक्ष व्यक्तीची मुलाखत झाल्यांनतरच त्यांच्या स्वभावाची जाणीव होते हे…