शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाआधी हळद का लावली जाते?, नवरी मुलीच्या हातावर मेहंदी का काढतात?, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 12:59 pm
in Trending
Reading Time: 4 mins read
google-news
Haldi or mehndi to bride and groom in marriage What is the exact reason see the details

लग्नाआधी हळद का लावली जाते?, नवरी मुलीच्या हातावर मेहंदी का काढतात?, 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

भारतात लग्नसमारंभ म्हणजे जणू एक प्रकारचा मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की लग्नात होणाऱ्या प्रत्येक विधीमागे एक श्रद्धा किंवा शास्त्र असते. तुम्हाला माहीत आहे का लग्नात वधू-वरांना हळद का लावली जाते? किंवा वधूचे हात मेहंदीने का सजवले जातात? आणि याचे नेमके महत्त्व काय?. चला तर जाणून घेऊया या लग्न विधीमागील नेमके कारण काय?

लग्नापूर्वी जेव्हा हळद लावली जाते तेव्हा त्याचे काही अंश नाकावर पडतात आणि ते श्वासावाटे शरीरात जातात. शरीरामधील प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हळद अधिक उपयुक्त असते. अलिकडच्या संशोधनामधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, सर्दीपासून मुक्तता मिळवण्यासाठी, डोकेदुखी कमी होण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी अशा अनेक फादेशीर गोष्टींसाठी हळद नाकावाटे, शरीरामध्ये गेली तरी अनेक आजार दूर होतात. शिवाय शरीरावरही त्वचेला हळद लावल्यास अनेक शारिरीक फायदे तुम्ही अनुभवू शकता. एखादी मुलगी तिचं घर कायमचं सोडून दुसऱ्या घरी जात असताना तिच्या मनावर बराच ताण असतो. हा विचारांमुळे लग्नादरम्यान मुलींमधील हार्मोनल्सचं संतुलन बिघडतं. हार्मोनल्स पातळीचं संतुलन राखण्यासाठीही हळद लावण्यात येते.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – “बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

फक्त हळद नव्हे तर लग्नाआधी मुलीला मेहंदीही लावली जाते. त्यामागेही काही कारणं आहेत. ज्या भागाला हळद लावली जाते त्या भागाला मेहंदी लावली जात नाही. ज्या भागावर मेहंदी लावली जाते त्या भागावर हळद लावली जात नाही. तळहातावर मेहंदी लावतात तर त्याच्या मागच्या बाजूला हळद लावतात. चेहऱ्याला हळद लावतात तर डोक्याला मेहंदी लावतात. मेहंदी आणि हळद एक उष्ण व एक थंड हा विरोधाभास आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी उष्ण आणि थंड हे गुण एकत्र यावेच लागतात.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्…; ‘त्या’ पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

दरम्यान, भारतभरात अनेक ठिकाणी आजही अशी प्रथा आहे आणि ती एक सामान्य प्रथाच मानली जाते. लग्नाच्या आधी हळदीने नवरा-नवरीची दृष्ट काढली जाते. असे म्हणतात की हळद लावल्याने नव्याने आयुष्य सुरु करणाऱ्या नवरा नवरीला वाईट नजरेपासून सुरक्षा मिळते. ही श्रद्धा सुद्धा हळदीच्या पवित्रतेशीच निगडीत आहे. तसेच मेहंदी लावणे ही केवळ भारतीय परंपरा नाही, तर मेहंदीचेही आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतात. त्यामुळे नवरीला मेहंदी लावण्यात येते.

Tags: entertainment newshaldiImportance of Turmeric and Mehndimarathi entertainment newsMarathi newsMehndiPre Marriage Ritualsमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमेहंदीलग्नापूर्वीचे विधीहळद व मेहंदी महत्त्वहळदी
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Kareena Kapoor Karishma Kapoor Struggle Story

इंडस्ट्रीमधून तुच्छ वागणूक, अपमान अन्…; बहिणीची 'ती' हालत बघून करीना कपूरलाही होत होतं दुःख, करिश्माविषयी म्हणालेली, "तिला रडताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.