बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्याने त्याच्या मुलीचं नाव लारा असं ठेवलं होतं. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तो कुटुंबासहित मुंबईबाहेर जाताना दिसला. त्यावेळी त्याच्या मुलीची पहिली झलक बघायला मिळाली होती. अशातच आता नताशा व वरुणबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. दोघंही आता मुंबईमध्ये घर खरेदी केले आहे. (varun dhawan new home)
वरुण व त्याची पत्नी नताशा दलाल यांनी मुंबई येथील जुहू भागात एक महागडे व अलिशान घर खरेदी केले आहे. सुमारे ५००० स्क्वेअर फुटपेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या या घरासाठी 2.67 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. दरम्यान या घराची किंमत सुमारे ४४.५२ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे घर जुहू येथील ‘डीडेकोर ट्वेंटी’मध्ये ४४.५२ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घराचा अंतिम व्यवहार ३ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाला आहे.
‘इंडेक्स टॅप.कॉम’च्या माहितीनुसार,वरुण व नताशा यांचे हे घर ५००० स्क्वेअर फुटपेक्षा अधिक क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले आहे. प्रती स्क्वेअर फुट ८७.०८९ रुपये असा दर आहे. ही अपार्टमेंट सहसा सेलिब्रिटी रहिवासी व लग्जरी लाईफस्टाइलसाठी ओळखली जाते. वांद्रे, जुहू या भागांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतिक्षा’ व ‘जलसा’ हे दोन बंगले जुहू येथे आहेत. तसेच धर्मेंद्र, हेमा मालीनी,अक्षय कुमार, अजय देवगण, काजोल, गोविंदा असे अनेक कलाकार या भागांमध्ये राहतात.
वरुण व नताशा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर गेल्या वर्षी ३ जून २०२३ रोजी आई-वडील झाले आहेत. दोघंही मुलीबरोबर हृतिक रोशनच्या जुहू येथील घरामध्ये राहायला जाणार होते. या घरासाठी दरमहा ते ८ लाख रुपये भाडं भरणार होते अशी चर्चादेखील सोशल मीडियावर सुरु होती.