महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख. संपूर्ण चित्रपट सृष्टीत ही जोडी त्यांच्या प्रेमासाठी परिचित आहेच त्याच बरोबर त्यांच्या कामासाठी ही तेवढीच ओळखली जाते. अभिनया सोबतच या जोडीने दिगदर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांच्या “वेड” या चित्रपटाने तर सर्वत्र हवाच केली. आता मात्र जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Genelia Deshmukh Riteish Deshmukh)
पहा जेनेलियाचा का होतंय कौतुक (Genelia Deshmukh Riteish Deshmukh)
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जेनेलियाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला त्यानंतर जेनेलिया रितेश कडे म्हणताना दिसतेय, अहो.. तुम्ही मला श्रावणी दिली मी तुम्हाला हे अवार्ड दिल, लव्ह यु असं म्हणत. यावर रितेशही तिच्याकडे हसत पाहत असतो. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कलाकार ही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करताना दिसतायत. त्यानंतर रितेश व्यासपीठावर जातो, आणि जेनेलिया तिला मिळालेला पुरस्कार रितेशला देते, पुरस्कार घेतल्यानंतर रितेश व्यासपीठावरच जेनेलियाच्या पाया पडतो, हे सर्व पाहून सगळेच कौतुकाने हसू लागतात.

झी मराठीकडून सोशल मीडियावर या कार्यक्रमासाठी एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यादरम्यान जेनेलिया आणि रितेशची व्यासपीठावरील गंमत पाहायला मिळाली. ‘वेड’ या चित्रपटामुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. त्यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयष्यामुळेही त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात. अनेकदा ते त्यांच्या मुलांबरोबर विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. दरवेळी त्यांची दोन्ही मुलं फोटोग्राफर्सना बघून हात जोडताना दिसतात. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचं सगळेजण नेहमीच कौतुकही करतात.(Genelia Deshmukh Riteish Deshmukh)
====
हे देखील वाचा – ‘ताजं गुलाबाच फुल..’ म्हणत प्राजक्ताच्या मोहक फोटोशूटची रंगलीय चर्चा
====
रितेश आणि जेनेलियाचा वेड सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी त्यामध्ये काही बदल करून नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये ‘वेड तुझा’ या रोमँटिक गाण्याचे रितेश आणि जेनेलिया यांच्या शूट करण्यात आलेलं नवं व्हर्जनही प्रदर्शित केले गेले. त्यांच्या या गाण्यात जेनेलिया आणि रितेश म्हणजेच चित्रपटातील श्रावणी आणि सत्या यांच्या लग्नाचे काही खास क्षण पाहायला मिळाले.
