बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. रितेश व जिनिलीयाला पाहिल्यानंतर संसार कसा असावा? याचं उत्तर मिळतं. दोघंही कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र घर, कुटुंब, मुलं सांभाळून ते स्वतःचं कामंही अगदी परफेक्ट करतात. आता हेच बघा ना दोन्ही मुलांना सांभाळायचं, त्यांना योग्य ते संस्कार द्यायचे म्हणून जिनिलीयाने चक्क तिच्या करिअरमधूनच ब्रेक घेतला. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामधून तिने दमदार कमबॅक केलं. पण आधी जिनिलीयाने कुटुंब, मुलांना प्राधान्य द्यायचं ठरवलं. रितेश व जिनिलीया एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. हे प्रत्येकवेळी दिसून येतंच. असाच एक व्हिडीओ गेल्या काही वर्षांपासून व्हायरल होताना दिसतो. रितेश व प्रीती झिंटा यांची भेट आणि त्यावर जिनिलीयाच्या चेहऱ्यावरचे हावभाव असा तो व्हिडीओ आहे. (riteish deshmukh preity zinta viral video)
व्हायरल व्हिडीओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रितेश व प्रीतीची भेट होते. यावेळी रितेश प्रीतीशी हसत-खेळत संवाद साधतो. इतकंच नव्हे तर तिच्या हाताला किसही करतो. हे सगळं जिनिलीया बघत असते. मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव राग असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. आता बऱ्याच वर्षांनी जिनिलीयाने या व्हायरल व्हिडीओवर तिचं मत मांडलं आहे. त्यावेळी नक्की काय झालं होतं? हे जिनिलीयाने सांगितलं.
आणखी वाचा – विमानतळावर रडतच आली नोरा फतेही, जवळच्या व्यक्तीच्या निधनाने धक्का, बॉडीर्गार्डने चाहत्याला धक्का मारला अन्…
जिनिलीया म्हणाली, “हा व्हिडीओ शूट करणाऱ्या कॅमेऱ्यामॅनला सॅल्युट. त्याने खूप मस्त काम केलं आहे. हा व्हिडीओ पाहून मला खूप हसायला आलं होतं. आताही जेव्हा मी बघते तेव्हा हसायला येतं. रितेशची नंबर वन बायको मला बनायचं आहे हे अगदी स्पष्ट आहे. मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. व्हिडीओमध्ये व्हायरल होणारी गोष्ट आमच्यासाठी खूपच छोटी आहे. गेल्या २३ वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत”.
आणखी वाचा – “मुंबईत राहून अजून मराठी येत नाही?”, मराठमोळ्या अभिनेत्रीने कपिल शर्माला धारेवर धरलं आणि…; जुना व्हिडीओ समोर
पुढे जिनिलीया म्हणाली, “लोक विविध गोष्टी तयार करतात. रितेश व प्रीतीचा व्हिडीओही कमालीचा एडिट केला होता. कॅमेऱ्यामॅनच्या कामालाच मला दाद द्यावी लागेल. असे कित्येक व्हिडीओ आहेत जे फालतू आहेत. मला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही. यामागे काहीच अर्थ नाही. उगाच काहीतरी वाढवून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. छोट्या गोष्टीला अगदी मोठं केलं”. जिनिलीयाने बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा तिच्या व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं.





