‘वेड’ चित्रपटानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा अधिक चर्चेत आहे. ‘वेड’ या त्यांच्या चित्रपटाने बक्कळ पैसा कमवला. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि चाहत्यांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून धरले. २० कोटी रुपयांचा गल्ला पार करून ‘वेड’ या चित्रपटाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. (genelia deshmukh new reel)
रितेश आणि जेनेलियाने २०१२ मध्ये लगीनगाठ बांधली. सोशल मीडियावर रितेश आणि जेनेलिया खूपच सक्रिय आहेत. अनेक रिल्स आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. जेनेलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
पहा जेनेलियाचा नवा रील व्हिडीओ – (genelia deshmukh new reel)

विकेंड असल्याने जेनेलिया थोडीशी निवांत दिसतेय. #वीकेंडरिल्स असे कॅप्शन देत जेनेलियाने एक रील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जेनेलियाने नुकताच एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिलमध्ये सुरुवातीला जेनेलियाही पुरुष आणि महिलांबद्दल बोलताना दिसत आहे. “पुरुष गाडी चालवतात, दुचाकी चालवतात, जहाज चालवतात, विमान चालवतात, पण मग आम्ही बिचाऱ्या महिलांनी तोंडही चालवू नये”, असे जेनेलिया यात बोलताना दिसत आहे.
जेनेलियाने हा व्हिडीओ शेअर करत दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. “रिल हे फक्त मजा-मस्तीसाठी आहे. पण हे गंभीरपणे लक्षात ठेवा. स्त्रियांनो हे खरं आहे”, असे कॅप्शन जेनेलियाने दिले आहे.
====
हे देखील वाचा – अभिनया व्यतिरिक्त सायलीचा राजकारणात रस
====
अभिनयाची आवड जोपासत जेनेलियाने हिंदी विश्वातून अभिनयाची सुरुवात केली. हिंदी बरोबरच तिने तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली.(genelia deshmukh new reel)
जेनेलियाला महाराष्ट्रात ‘वहिनी’ म्हणूनच सगळे आवाज देतात. रितेश आणि जेनेलिया यांना लग्नाला १० वर्ष झाले आहेत. मागील १० वर्षांपासून त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. ‘वेड’ चित्रपटादरम्यान त्यांच्या प्रेमाची प्रचिती मोठ्या पडद्यावर अनुभवलीच मात्र खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकमेकांसाठीच बनलेली आहे.
