अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी शूर मावळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची सध्या चांगलीच चलती आहे. अनेक चित्रपट, मालिका, नाटक हे इतिहासावर अभ्यास करून निर्मिती केली जात आहे. अशातच आघाडीचे दिगदर्शक आणि इतिहास प्रेमी दिग्पाल लांजेकर हे सध्या अफलातून कलाकृती सह प्रेक्षकांचं मनोरंजन आणि इतिहासाप्रती जनजागृती करण्याचं काम अगदी चोखपणे करत आहेत.(Subhedar Film motion poster)
दिग्पाल लांजेकर सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर सरदार यांच्या शौर्यगाथेवर शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेवर काम करत आहेत. ज्यातील ४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. तर लवकरच ‘ सुभेदार गड आला पण’ हा शिवराज अष्टकातील ५ व चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं सोबतच चित्रपटातील अन्य कलाकारानं बाबत माहिती देण्यात आली.

मोशन पोस्टर ला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलेलं पाहायला मिळतंय तर मोशन पोस्टर मधील ‘रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
आले मराठे आले मराठे
आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे)
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पाच्छाई झोडती असे मराठे
सुभेदार
गड आला पण ….
????????????’ (Subhedar Film motion poster)
अंगांगावर शहारे आणणाऱ्या या वाक्यांनी चित्रपटाची उत्सुकता अजून शिगेला लागली पोहचली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून त्याच्या सह मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, विराजास कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृन्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, यांच्या सह अन्य कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. दिग्पाल लांजेकर यांची त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून पोस्ट करत या बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या पोस्टर वर प्रेक्षकांनी भाभृ कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तर शिवराय अष्टकालीतील पाचवं पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. येत्या जून महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.