आज देशभरात सर्वत्र मकरसंक्रातीनिमित्त उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मकर संक्रांतीला हळदी-कुंकू करून, तिळगुळ देऊन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा तिळवा केला जातो. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अनेक कलाकार मंडळी ही मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशातच अभिनेत्री जिनीलिया देशमुखनेही आजचा मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही मराठी सण, उत्सव, परंपरा ती मोठ्या आनंदाने साजरे करत असते. (Genelia Deshmukh celebrated Makar Sankranti)
जिनिलीया ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच ती मराठी सणांच्या सेलिब्रेशनचीही खास झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. याचबद्दल देशमुखांच्या सुनबाईंचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं. जिनिलीया ही अवघ्या महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे. जिनिलीया तिच्या धर्मातील सण-समारंभ साजरे करण्याबरोबरच आपली मराठी संस्कृतीही जपते. अशातच तिने आजचा मकरसंक्रांतीचा सण साजरा केला आहे. जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – “नवीन काम मिळालं आणि…”, ‘प्रेमाची गोष्ट’च्या नवीन मुक्ताची शूटनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “सेटवर…”
या फोटोमध्ये ती सुगड पूजन करताना दिसत आहे. या फोटोमध्ये जिनिलीयाने काळी साडीही परिधान केलेली पाहायला मिळत आहे. हातात हळदी-कुंकवाचा करंडा घेऊन ती हे पूजन करत असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. यासह आजूबाजूला पूजेचे सामान ठेवलेलेही पाहायला मिळत आहे. तर जिनिलीयाने शेअर केलेल्या पुढील स्टोरीमध्ये ती आपल्या दोन्ही मुलांना तिळगूळ भरवतानाचे पाहायला मिळत आहे. मुलांना तिळगूळ भरवताना तिने तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – “जोपर्यंत तो बोलवत नाही तोपर्यंत…”, महाकुंभ मेळ्याला गेलेल्या मराठी अभिनेत्याला दैवी अनुभव, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, जिनिलीया देशमुख हा जन्माने ख्रिश्चन असली तरी ती आपलं मराठीपण कायम जपत आली आहे आणि तिच्या याच कृतीचे सर्वत्र कौतुक होतं. जिनिलीयाने याआधी वटपौर्णिमा, आषाढी एकदाशी, गणपती, दिवाळी आणि नवरात्र असे सगळे सण मोठ्या हौशीने साजरे केले असून याचे खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने अंजक्या मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत आणि सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.