हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक महाकुंभ मेळा यंदा १३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात येत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये लाखो भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी या मेळ्याला उपस्थित आहेत. अशातच एक मराठी अभिनेताही या कुंभमेळ्याला पोहोचला आहे आणि हा अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले. अनेक वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचा अनुभव घ्यावा अशी इच्छा अनेकांची असते. अभिनेता सौरभ चौघुलेची हीच इच्छा पूर्ण झाली आणि त्याला महाकुंभमेळ्याचा अनुभव घेता आला. (saorabh choughule mahakumbh mela experience)
याबद्दल सौरभने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुंभमेळ्याचा अनुभव शेअर करताना त्याने असं म्हटलं आहे की, “अचानक जुना मित्र कुंभला जात आहे असं सांगतो काय, त्याच्या ग्रुपमधल्या एकाचे जाणे रद्द होतं काय आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मेळ्याला जायचं ठरतं काय! निव्वळ योगायोग. असे म्हणतात, जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही. असंच काहीसं हे एक. १४४ वर्षानंतर येणारा महाकुंभमेळा, असं म्हणतात तीन पिढ्यानंतर एका पिढीला हा योग मिळतो आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं”.
आणखी वाचा – नवीन काम मिळालं आणि…”, ‘प्रेमाची गोष्ट’च्या नवीन मुक्ताची शूटनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “सेटवर…”
यापुढे त्याने “हर हर गंगे, हर हर महादेव” असंदेखील म्हटलं आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता ऐन थंडीच्या कडाक्यात नदीमध्ये शाहीस्नान करताना दिसत आहे. अंगावर उपरणं घालून अभिनेत्याने नदीमध्ये शाहीस्नान केलेलं दिसत आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचं कमेंट्समधून कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार
“हर हर महादेव…” म्हणत कौतुक केलं आहे. तर काहींनी “हर हर गंगे…”, “तुम्हे वहाका बुलाया था… हर हर महादेव…” अशा कमेंट्स अभिनेत्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतच महाकुंभमध्ये सहभागी झाल्याचे सांगितलं होतं. प्रयागराजच्या पवित्र भूमीवर. २०२५ च्या १४४ वर्षाने येणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा साक्षीदार होण्याचा संयोग, हे खरंच भाग्याचं आहे…” हर हर गंगे, हर हर महादेव!!”, असं कॅप्शन देत त्याने थेट कुंभमेळ्यातील फोटो शेअर केले होते.