प्रेमाला वय, धर्म, जात असं काहीही नसतं असं म्हणतात. तसेच प्रेम चांगलं वाईट असंही काही बघत नाही. अशाच काही लोकप्रिय जोड्या आहेत ज्यांनी धर्माची बांधनं झुगारून प्रेम साध्य केले आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात सध्या अनेक आंतरधर्मीय विवाह होत असलेले बघायला मिळतात. आशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी हिंदु-मुसलमान असा विवाह केलेला आहे. मात्र लग्नानंतर काही अभिनेत्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर काहीनी हा धर्म स्वीकारला नाही. हे कलाकार नक्की कोण आहेत? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (hindu muslim marriage actors)
सर्वात आधी अभिनेत्री शर्मिला टागोर व मंसुर अली खान यांची जोडी खूप पसंत केली. शर्मिला या बंगाली ब्राह्मण होत्या. त्या १९६९ साली पटौदीच्या नवाब मंसुर अली खान यांच्याबरोबर लग्न केले. त्यांनी यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी नाव बदलून आयेशा सुलतान ठेवले होते. त्याचप्रमाणे सगळ्यांचे लाडके अभिनेते धर्मेद्र यांनी हेमा मालीनी यांच्याशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यांनी नाव दिलावर खान ठेवले तर अभिनेत्रीचे नाव आयशा बी असे ठेवले.

अभिनेता सैफ अली खानचे पहिले लग्न अमृता सिंहबरोबर झाले. अमृताने सैफबरोबर लग्न करण्यासाठी १९९१ साली मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सारा अली खान व इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत. चित्रपट निर्माते व दिग्दर्शिक महेश भट्ट यांनी सोनी राजदानबरोबर लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यांना आलिया भट्ट व शाहीन भट्ट अशा दोन मुली आहेत.
आयेशा टाकिया १ मार्च २००९ साली लग्नबंधनात अडकली. तिने फरहान आजमीबरोबर लग्न केले. फरहान एक उद्योजक आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने आडनाव बदलून आजमी अअसे लावले. त्यांना एक मुलगादेखील आहे. अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या लग्ना,मुळे खूपच चर्चेत राहिली. राखी आदिल दूरानीबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारला. तिने नाव बदलून फातिमा असे ठेवले होते.