शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, “माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2025 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gargi Phule Facebook Post

प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, "माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल..."

Gargi Phule Facebook Post : मराठी मालिकाविश्वातील कलाकार त्यांच्या अभिनयासह स्पष्ट वक्तेपणामुळेही नेहमी चर्चेत असतात. त्यामधीलच एक लोकप्रिय आणि दमदार अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले. विविध मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत गार्गींनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली आहे. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांचा रोखठोक स्वभावही अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अशातच गार्गी फुले पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आणि यावेळीचं कारण आहे त्यांनी शेअर केलेली एक फेसबुक पोस्ट. या पोस्टमध्ये त्यांनी एका प्रॉडक्शन हाऊजच्या गैरव्यवहाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री गार्गी फुले यांनी शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये म्हटलंय की, “आज एका वेब सिरीयलसाठी फोन आला होता. प्राथमिक बोलणं झाल्यावर ती व्यक्ती म्हणाली, तुम्हाला लुकटेस्टसाठी उद्या मुंबईला यावं लागेल, मला उद्या लगेच निघणं शक्य नसल्यामुळे मी नंतर कधी येऊ शकते का? असं त्याला विचारलं. तर त्यांच्या सो कॉल्ड प्रॉडक्शनच्या एका व्यक्तीने मला म्हटलं, नाही उद्याच या नाहीतर तुमचा रोल गेला असं समजा. हे ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यांना मी म्हटलं, मला तुझा रोल नकोच. एखाद्या कलाकाराला त्यांची अडचण समजून न घेता तुमचा माजखोरपणा करून तुमची लायकी दाखवणार असाल तर अशा प्रॉडक्शन हाऊसच्या कामाला मी थुंकून ही विचारणार नाही. एखाद्या कलाकाराशी बोलण्याची ही कोणती भाषा? आणि प्रॉडक्शन हाऊसपर्यंत न जाता तुम्ही लगेच त्या कलाकाराला तुमचा रोल गेला असं सांगाल. त्याला काय उत्तर द्यायचं? ते मी दिलं आहे. पण मला या वृत्तीचा प्रचंड संताप आला”

आणखी वाचा – जत्रा, देवीची पालखी आणि…; गावी कोकणात पोहोचल्या छाया कदम व्हिडीओ पाहताच साधेपणाचं कौतुक

Gargi Phule Facebook Post
गार्गी फुले यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

गार्गी फुले यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया ही दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करत म्हटलं की, “त्याला स्पष्ट बोलीस ते खूप छान केलंस”, “गार्गी ताई अगदी योग्य केलं”, तर काहींनी म्हटलं “तुमच्यासारख्या नामांकीत कलाकारांशी असं बोल जात तर नवीन कलाकारांना कसं बोलत असतील” असं म्हणत नेटकऱ्यांनी गार्गी फुले यांचं कौतुक केलं.

आणखी वाचा – “हाल-हाल करुन त्याचं आयुष्य संपवा”, मालेगाव रेप प्रकरणी मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “अवयवांचा माज वेळीच ठेचायला हवा आणि…”

गार्गी फुले यांचा करियरबद्दल बोलायचं झालं तर ‘तुला पाहते रे’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि ‘राजा राणीची जोडी’ अशा मालिकांमधून दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट भूमिका गार्गी फुले यांनी साकारल्या आहे.

Tags: entertainmentGargi Phule Facebook Postmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Jui Gadkari

"तू चांगल्या घरातली दिसतेस इथे थांबू नकोस", जुई गडकरीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव, म्हणाली, "एकही माणूस दिसत नव्हता आणि.."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.