मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू चांगल्या घरातली दिसतेस इथे थांबू नकोस”, जुई गडकरीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव, म्हणाली, “एकही माणूस दिसत नव्हता आणि..”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2025 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari

"तू चांगल्या घरातली दिसतेस इथे थांबू नकोस", जुई गडकरीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव, म्हणाली, "एकही माणूस दिसत नव्हता आणि.."

Jui Gadkari : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसह तिच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते. सध्या जुई तिच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीच्या भूमिकेने रसिकांच्या मनात घर करुन आहे. जुईची मालिकेतील ही भूमिका बरीच गाजली आहे आणि तिला या भूमिकेमुळेच लोकप्रियता मिळाली आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच जुई पुन्हा एकदा तिच्या आयुष्यातील एका घटनेमुळे चर्चेत आली आहे.

नुकतंच जुईने सकाळ वृत्तपत्रात तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. हा अनुभव शेअर करत जुई म्हणाली, “माझी एक मालिका नुकतीच संपली होती आणि नवीन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोन आला होता. मी तयार होऊन रॉयल पाल्म्स हॉटेलमध्ये पोहोचले. पण एकही माणूस तिथे नव्हता. मी गाडीतून खाली उतरत होते तितक्यात गाडीच्या खिडकीजवळ एक डेंजर दिसणारा वॉचमन आला. त्याने ज्याप्रकारे मला बघितलं त्यामुळे मला भीतीच वाटली. त्याने मला विचारलं “कुठे जायचंय?” मी त्याला पत्ता दाखवला त्यानंतर त्याने मला बिल्डिंगजवळ सोडलं. मी पाचव्या मजल्यावर गेले. तिथे एक ३०-४० खोल्या होत्या पण सगळी दार बंद होती. तिथे एक मुलगा दिसला. त्याला मी पत्ता विचारला. त्याने मला रस्ता सांगितला. पण तिथे एकही माणूस दिसत नव्हता. मी त्यांना विचारलं की मला ऑडिशनसाठी बोलवलंय. त्या बाईने मला कॉन्फरन्समध्ये बसायला सांगितल त्यांनी मला पाणी आणून दिलं. पण त्या पाण्यात काही असेल या शंकेने मी ते प्यायले नाही असं जुई म्हणाली.

आणखी वाचा – जत्रा, देवीची पालखी आणि…; गावी कोकणात पोहोचल्या छाया कदम व्हिडीओ पाहताच साधेपणाचं कौतुक

पुढे जुईने सांगितलं, “नंतर ६०-६५ वयाचे सरदारजी तिथे आले त्यांचं ते ऑफिस होतं. त्यांनी मला विचारल की, या माणसाचा फोन आला होता का? त्यावर ते म्हणाले की तो फ्रॉड आहे. तू चांगल्या घरातली दिसतेस इथे थांबू नकोस. लगेच निघून जा. त्यानंतर मी लगेच तिथून निघाले आणि पार्किंगला पोहोचले, गाडी काढली पण हायवेला जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. फिरून फिरून सतत एका भल्या मोठ्या बंद पडलेल्या हॉटेलसमोर येत होते. रस्त्यावर कोणी नाही तेवढ्यात मला एक सायकलवरून माणूस येताना दिसला. त्यांना विचारल हायवेला जायचंय”.

आणखी वाचा – प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, “माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल…”

पुढे जुई म्हणाली, “ते म्हणाले, “मॅडम हा काय हायवे, समोर तर आहे. मी अचानक एका वाईट स्वप्नातून बाहेर आले असं मला वाटलं. समोर हायवे होता आणि रस्त्याच्या बाजूला बोर्ड होता ‘स्वामी समर्थ मंदिराकडे. मी त्या विचित्र संकटात अडकले होते. पण पुन्हा एकदा स्वामींनी मला यातून बाहेर काढलं असं जुई म्हणाली.

Tags: entertainmentjui gadkarimarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Shubhangi Sadavarte kelvan

घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, केळवणाचा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.