शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक अजूनही अविवाहित का? , स्वतःच सांगितलं कारण, म्हणाल्या, “माझे आई-वडील…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 27, 2024 | 12:02 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
falguni pathak on marriage

प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक अजूनही अविवाहित का? , स्वतःच सांगितलं कारण, म्हणाल्या, "माझे आई-वडील…"

नवरात्र म्हंटली की गरबा समोर येतो. अर्थातच त्यामुळे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. बॉयकट, नेहमी सूट किंवा शर्ट पॅंटमध्ये असणाऱ्या फाल्गुनीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत असते. मात्र इतके वय होऊनदेखील फाल्गुनीने अजून लग्न का केले नाही? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्यावर स्वतः फाल्गुनी यांनी खुलासा केला आहे. गायिका नुकतीच अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या एका चॅट शोमध्ये पोहोचली होती. यावेळी त्यांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. (falguni pathak on marriage)

करिश्माच्या शोमध्ये आल्यानंतर त्यांच्या फाल्गुनीबरोबर अनेक गप्पा झाल्या. यावेळी त्यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “माझ्यासाठी संगीतच सगळं आहे. आतापर्यंत संगीताव्यतिरिक्त मी कशाचाही विचार केला नाही. मी संगीताबरोबर अधिक जोडले गेले आहे. मी लहानपणापासून संगीताशी जोडले गेले आहे आणि यापुढेही असेन. माझी काळजी घेण्यासाठी माझे आई-वडील आहेत तसेच मी स्वतःही आहे”. तसेच तिला बॉयकट लूकबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तिने उत्तर दिले की, “आई-वडिलांना चार मुली झाल्या पण मुलगा नाही झाला. त्यामुळे लहानपणापासूनच मी मुलांप्रमाणे राहू लागले”.

आणखी वाचा – मोठी बातमी! ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, कारणही आलं समोर

View this post on Instagram

A post shared by Karishma K Tanna (@karishmaktanna)

फाल्गुनीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती गायिका असण्या बरोबरच ती एक कलाकार व संगीतकारदेखील आहे. १९८७ साली त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला गाण्याचा अल्बम १९९८ साली समोर आला होता. तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘कौन बनेगा करोंडपती’ व ‘कॉमेडी नाईट्स’ अशा अनेक कार्यक्रमांमध्येही दिसून आली होती.

आणखी वाचा – परदेशातही गल्ली क्रिकेटचा आनंद लुटतोय संकर्षण कऱ्हाडे, घराच्याही आठवणीत रमला आणि…; म्हणाला, “आज ॲटलांटा …”

तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, वयाच्या नवव्या वर्षी तिने  पहिला परफॉर्मन्स दिला. याबद्दल जेव्हा तिच्या घरी माहीत पडलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी मारलंही होतं. फाल्गुनी यांनी भवदीप जयपूरवाले यांच्याकडे संगीताचे पाच वर्ष प्रशिक्षण घेतले. मिळालेल्या माहितीनुसार फाल्गुनी एका शोचे त्या २० ते २५ लाख रुपये मानधन घेतात.  

Tags: falguni pathakgaraba queensinger
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Genelia Deshmukh On children

Video : रितेश व जिनिलीया देशमुखची मुलं फुटबॉल खेळण्यासाठी रात्रं-दिवस करत आहेत मेहनत, म्हणाली, "सकाळी सहा वाजतात उठतात अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.