मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, कारणही आलं समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 27, 2024 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dharmaveer 2 release date

मोठी बातमी! 'धर्मवीर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, कारणही आलं समोर

‘धर्मवीर’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या आगामी सिनेमाकडे प्रेक्षकांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. नुकताच या चित्रपट सोहळ्याचा भव्य दिव्य असा ट्रेलर लॉन्च सोहळा थाटामाटात संपन्न झाला. अगदी राजकीय नेते, कलाकार मंडळी, दिग्गज मंडळी यांच्या उपस्थितीत बॉलीवूडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासाचा पुढचा टप्पा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धर्मवीर या चित्रपटाचा हा सिक्वेल असून धर्मवीर चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यांत शंका नाही. (Dharmaveer 2 release date)

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला होता. अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारलेली धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका हे धर्मवीर चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचा टीझर लाँच करुन दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या सगळ्या प्रश्नांना पुर्णविराम दिला. २० जुलैला मुंबईत ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आणि या सोहळ्यास मोठ्या मोठ्या दिग्गजांनी उपस्थिती लावली. चित्रपटाचं लाँच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालं.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करणार मराठी गायक व परदेसी गर्ल, प्रोमोने वेधलं लक्ष, पण हे आहेत तरी कोण?

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अशातच आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत, “राज्यात सुरु असलेली पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. पुढील प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करु”, असं कॅप्शन देत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आणखी वाचा – प्रतिमाला पाहून सुभेदार कुटुंबाला बसला मोठा धक्का, रविराजबरोबरही तिची भेट होणार का?, सर्वांना ती ओळखू शकेल का?

‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टुडिओज’ आणि ‘साहील मोशन आर्ट्स’ या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी साकारली आहे.

Tags: dharmaveer 2Dharmaveer 2 release datemarathi movienew upcoming movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Sankarshan Karhade Enjoying At America

परदेशातही गल्ली क्रिकेटचा आनंद लुटतोय संकर्षण कऱ्हाडे, घराच्याही आठवणीत रमला आणि…; म्हणाला, "आज ॲटलांटा …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.