Folk Singer Sharda Sinha Admit : गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्स रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. नुकतेच त्यांचे पती ब्रज किशोर यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. या वर्षी शारदा व तिच्या पतीने त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस साजरा केला. शारदा सिन्हा या ७२ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांना गेल्या काही दिवसांपासून खाण्यापिण्यातही अनेक समस्या येत होत्या, असे काही अहवालात म्हटले आहे.
अद्याप त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणतेही हेल्थ अपडेट दिलेले नाहीत. शारदा सिन्हा या एक लोकप्रिय लोकगायिका आणि शास्त्रीय गायिका आहेत. त्या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहेत. शारदा सिन्हा या मैथिली व भोजपुरी गाण्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘विवाह गीत’ आणि ‘छठ गीत’ यांचा समावेश आहे.
आणखी वाचा – रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला ‘हा’ प्रकार, नेमकं काय झालं?

संगीतातील योगदानाबद्दल त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर ‘मैंने प्यार किया’ मधील ‘काहे तो सजना’ सारख्या काही बॉलिवूड गाण्यांमध्येही त्यांनी आपला मनमोहक आवाज दिला आहे. ‘हम आपके है कौन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.
त्याच्या कारकिर्दीत, त्यांनी HMV, टिप्स आणि टी-सिरीजसह मोठ्या संगीत ब्रँडसाठी नऊ अल्बममध्ये ६० हून अधिक छठ गाणी गायली आहेत.