कलाकारांच्या माय लेकीच्या जोड्या पाहणं नेहमीच चाहत्यांना आवडत. अशीच मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अशी मायलेकींनी जोडी म्हणजे उर्मिला कोठारे आणि जिजा कोठारे. उर्मिला सोशल मीडियावर लेकीसोबतचे नवनवीन फोटो नेहमीच शेअर करत असते. अशातच उर्मिलाने शेअर केलेला एक व्हिडीओ विशेष लक्षवेधी ठरतोय. यांत या मायलेकी गुढी पाडवा साजरा करताना दिसतायत.(urmila kothare jija kothare)
पहा उर्मिला जिजाचा मोहक लूक (urmila kothare jija kothare)
केसांत गजरा, नथ परिधान करून दोघी खूपच मोहक दिसतायत. तर यात उर्मिलाने खणाची साडी नेसली असून जिजाने खणाचा छान असा फ्रॉक परिधान केला आहे. या पारंपरिक वेशात उर्मिला आणि जिजा यांचं सौंदर्य अधिकच खुलून आलेलं दिसतंय. नववर्षाच्या स्वागताला ही मायलेकींची जोडी नटलीय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तर उर्मिलाने शेअर केलेल्या या व्हिडिओला दिलेलं ‘साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू चांदणी हे गाणं अगदी साजेस आहे.

गुढी पाडव्याचे औचित्य साधत उर्मिला आणि जिजा या मायलेकींनी केलेलं हे खास फोटोशूट चाहत्यांसोबत कलाकारांनाही विशेष भावलंय. उर्मिलाच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, सुयश टिळक, सुखदा खांडकेकर, फुलवा खामकर आदी कलाकारांनी कमेंट करत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. तर किती किती गोड ते, mother daughter duo अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.(urmila kothare jija kothare)
====
हे देखील वाचा – ‘छान आणि सुखाचा संसार चाललाय आमचा’ म्हणत प्रियदर्शिनीने सांगितली तिच्या घराची गोष्ट
====
उर्मिला जिजा सोबतचे एकत्र घालवलेले क्षण कायमच फोटोरूपी चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. उर्मिला अनेकदा तिचे नृत्य करतानाचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना चाहतेही भरभरून दाद देत असतात. तर तिच्या आणि जिजाच्या गुढीपाडवा विशेष या व्हिडिओला ही चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.
