Vallari Viraj New Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. तसेच लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली. २५ मे २०२५ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. वल्लरी पुन्हा मालिकेत कधी पाहायला मिळणार यासाठी चाहते नेहमी विचारणा करत असायचे. अखेर आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत येत आहे.
अवघ्या ७ महिन्यानंतर वल्लरी झी मराठीवर पुन्हा कमबॅक करत आहे. ‘शुभ श्रावणी’ ही नवीकोरी मालिका घेऊन अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला. ही नवीन मालिका ‘झी मराठीवर’ जानेवारी महिन्यापासून सुरू होईल. श्रावणीचे वडील राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने आलिशान राजवाड्यात या मालिकेच्या पहिल्या प्रोमोचं शूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नायिकेचे वडील असतात शिक्षणमंत्री आणि त्यांचं नाव आहे विश्वंभर राजेशिर्के तर, या मालिकेत शुभंकर या नायकाच्या घरची परिस्थिती बेताची असल्याचं पाहायला मिळत आहे पण, पैसा नसला तरी शुभंकरच्या घरी मनाची श्रीमंती असते, सगळेजण त्याच्यावर प्रेम करत असतात श्रावणीच्या बाबतीत असं काहीच नसतं. तिला घरी वडिलांचं प्रेमही मिळत नाही असं प्रोमोमध्ये पाहायला मिळाले.
दरम्यान वल्लरीची छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री झाली असून चाहत्यांनी मालिकेच्या प्रोमोवर कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऑल द बेस्ट वल्लरी, अभिनंदन, कौतुकास्पद, पुन्हा एकदा तुला छोट्या पडद्यावर पाहताना खूप आनंद होत आहे, तुझ्या नवीन कामासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी प्रोमोवर केल्या आहेत. तर ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत अनेक कलाकार झळकणार आहे. वल्लरी विराजसह अभिनेता सुमित विजय प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय या मालिकेच्या निमिताने तब्बल ९ वर्षांनी लोकेश गुप्ते छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी देखील या मालिकेत झळकणार आहेत. याशिवाय जुई तनपुरे, कोमल शेटे, असे बरेच कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.




