शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फरहान अख्तर लवकरच होणार बाबा?, ४४व्या वर्षी शिबानी दांडेकर गरोदर, लग्नाच्या तीन वर्षांनंतर निर्णय

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2025 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Farhan Akhtar Wife Pregnant

फरहान अख्तर लवकरच होणार बाबा?, ४४व्या वर्षी शिबानी दांडेकर गरोदर, लग्नाच्या तीन वर्षांनंतर निर्णय

Farhan Akhtar Wife Pregnant : बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. फरहान व शिबानी यांची नेहमीच चर्चा रंगलेली असते. दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अशातच फरहान अख्तर व शिबानी दांडेकर पुन्हा एकदा चर्चेत आलेले पाहायला मिळतात. फरहान व शिबानीच्या घरात चिमुकल्याचं आगमन होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. फरहानची पत्नी शिबानी गरोदर असल्याचं बोललं जात आहे. फरहान व शिबानी दोघांनीही तीन वर्षांपूर्वी कोणताही धार्मिक विधी न करता लग्न केले. फरहानचे हे दुसरे लग्न होते. याआधी तो दोन मुलींचा वडीलही आहे.

‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तरची पत्नी शिबानी गर्भवती असून ती त्यांच्या पहिल्या मुलाची आई होणार आहे. मात्र, शिबानी ४४ वर्षांची असून या वयात नैसर्गिकरित्या आई बनणे शक्य नसल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे ते सरोगसी किंवा आयव्हीएफ तंत्राद्वारे पालक बनण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. फरहान अख्तरने दोनदा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न २००० मध्ये अधुना भाबानीबरोबर झाले होते. याआधी दोघेही तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली भेट फरहानच्या दिग्दर्शनातील डेब्यू सिनेमा ‘दिल चाहता है’ दरम्यान झाली होती.

आणखी वाचा – इमारतीला लागलेल्या आगीतून उदित नारायण थोडक्यात बचावले, भीषण घटनेबाबत पहिल्यांदाच झाले व्यक्त, म्हणाले, “तुमच्या आशीर्वादामुळे…”

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

या चित्रपटाद्वारे अधुनाने बॉलिवूड हेअरस्टाइलिस्ट म्हणून डेब्यू केले होते. फरहान व अधुना यांना शाक्य व अकिरा या दोन मुली आहेत. मात्र लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. २१ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली. लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांचे नाते तुटले आणि एप्रिल २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे आहे.

आणखी वाचा – ‘इमर्जन्सी’नंतर कंगना रणौतचा मोठा निर्णय, परिस्थितीला कंटाळून निर्णय, म्हणाली, “यापुढे कोणताही राजकीय…”

घटस्फोटाच्या एका वर्षानंतर २०१८ मध्ये फरहानने व्हीजे शिबानी दांडेकरला डेट करायला सुरुवात केली. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांनी लग्न केले. तसेच २१ फेब्रुवारीला वांद्रे येथे रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. फरहान मुस्लिम आहे आणि शिबानी हिंदू आहे. फरहान ५१ वर्षांचा आहे तर शिबानी ४४ वर्षांची आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर शिबानी गरोदर असून ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचं समोर आलं आहे.

Tags: bollywood newsfarhan akhtar and shibani dandekarFarhan Akhtar Wife Pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
dhanshree verma troll

युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटावरुन नेटकऱ्यांनी धनश्री वर्मालाच ठरवलं दोषी, अनुष्का शर्माबरोबर तुलना करत म्हणाले, "प्रेरणा घे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.