Farhan Akhtar Wife Pregnant : बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. फरहान व शिबानी यांची नेहमीच चर्चा रंगलेली असते. दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अशातच फरहान अख्तर व शिबानी दांडेकर पुन्हा एकदा चर्चेत आलेले पाहायला मिळतात. फरहान व शिबानीच्या घरात चिमुकल्याचं आगमन होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. फरहानची पत्नी शिबानी गरोदर असल्याचं बोललं जात आहे. फरहान व शिबानी दोघांनीही तीन वर्षांपूर्वी कोणताही धार्मिक विधी न करता लग्न केले. फरहानचे हे दुसरे लग्न होते. याआधी तो दोन मुलींचा वडीलही आहे.
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तरची पत्नी शिबानी गर्भवती असून ती त्यांच्या पहिल्या मुलाची आई होणार आहे. मात्र, शिबानी ४४ वर्षांची असून या वयात नैसर्गिकरित्या आई बनणे शक्य नसल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे ते सरोगसी किंवा आयव्हीएफ तंत्राद्वारे पालक बनण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. फरहान अख्तरने दोनदा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न २००० मध्ये अधुना भाबानीबरोबर झाले होते. याआधी दोघेही तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली भेट फरहानच्या दिग्दर्शनातील डेब्यू सिनेमा ‘दिल चाहता है’ दरम्यान झाली होती.
या चित्रपटाद्वारे अधुनाने बॉलिवूड हेअरस्टाइलिस्ट म्हणून डेब्यू केले होते. फरहान व अधुना यांना शाक्य व अकिरा या दोन मुली आहेत. मात्र लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. २१ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली. लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांचे नाते तुटले आणि एप्रिल २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे आहे.
आणखी वाचा – ‘इमर्जन्सी’नंतर कंगना रणौतचा मोठा निर्णय, परिस्थितीला कंटाळून निर्णय, म्हणाली, “यापुढे कोणताही राजकीय…”
घटस्फोटाच्या एका वर्षानंतर २०१८ मध्ये फरहानने व्हीजे शिबानी दांडेकरला डेट करायला सुरुवात केली. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांनी लग्न केले. तसेच २१ फेब्रुवारीला वांद्रे येथे रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. फरहान मुस्लिम आहे आणि शिबानी हिंदू आहे. फरहान ५१ वर्षांचा आहे तर शिबानी ४४ वर्षांची आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर शिबानी गरोदर असून ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचं समोर आलं आहे.