बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. तिचा बहूचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र काही कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून १७ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने ऑस्कर पुरस्कार निवडीवरुन भाष्य केले होते. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता तिने तिच्या चित्रपटांवरुन भाष्य केले आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने राजकीय चित्रपट करण्याबद्दल भाष्य केले आहे. ती नक्की काय म्हणाली? हे आपण आता जाणून घेऊया. (kangana ranaut on political movies)
कंगनाने ‘न्यूज १८’ ला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या आयुष्यात काहीही केलं त्या सगळ्यातून काही ना काही शिकायला मिळालं असं सांगितलं. ती म्हणाली की, “मी आता कोणताही राजकीय चित्रपट करणार नाही. मला यातून काहीही प्रेरणा मिळाली नाही. हे करणं खूप कठीण आहे. आता मला समजून आलं आहे की लोक असे चित्रपट का नाहीत. ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी खूप मस्त साकारली होती. पण मला विचाराल तर मी असे चित्रपट पुन्हा कधीही बनवणार आहे”.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले आहे. हा चित्रपट तयार करताना तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. याबद्दल ती म्हणाली की, “मी सेटवर कधीही माझं संतुलन गमावलं नाही. जर तुम्ही निर्माता आहात तर राग कोणावर काढणार? एक दिग्दर्शक म्हणून निर्मात्यांशी भांडू शकता पण तुम्ही दोन्ही भूमिकांमध्ये असाल तर कोणाशी भांडणार?”.
पुढे ती म्हणाली की, “कोरोनाच्या दरम्यान आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. माझ्याकडे आतंरराष्ट्रीय स्टाफ होता. ते लोक खूप काटेकोर असतात. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी त्यांना पैसे हवे असायचे. चित्रकरण केले नसेल तरीही मला पेमेंट करावे लागायचे. मला खूप समस्या आल्या. पण कोणासमोरही बोलून दाखवू शकत नव्हते”. आता कंगना पुढे कोणताही राजकीय चित्रपट करणार नाही यावर शिक्कामोर्तब केले आहे.