सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विस्कटलेले केस, काळा चेहरा, घाणेरडे दात अन्…; आमिर खानचा नवा लूक पाहून सगळेच हैराण, नव्या चित्रपटाची रंगली चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 7:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Amir khan new look

विस्कटलेले केस, काळा चेहरा, घाणेरडे दात अन्...; आमिर खानचा नवा लूक पाहून सगळेच हैराण, नव्या चित्रपटाची रंगली चर्चा

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या वैवाहिक जीवनामुळे अधिक चर्चेत असतो. पत्नी किरण राव व आमिर एकमेकांच्या संगनमताने विभक्त झाले. त्यानंतर दोघंही अनेकदा एकत्र माध्यमांसमोर आले आहेत. आमिरची मुलगी आयराच्या लग्नामध्येही दोघं एकत्र स्पॉट झाले होते. नुकताच आमिरच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला आणि किरण रावने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट  प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात दोघंही वेगळे झाले असले तरीही व्यावसायिक आयुष्यात मात्र अजूनही एकत्र काम करत आहेत.पण सध्या आमिर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Actor Amir khan new look)

२०१८ मध्ये आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. मात्र नंतर त्याने कोणत्याही चित्रपटामध्ये काम केले नाही.पण चाहते त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.अशातच आमिरचे काही विचित्र फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर ‘तारे जमीन पर’मधील बालकलाकार दर्शील सफारीदेखील दिसून येत आहे. दोघेही तब्बल १६ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या येणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ बद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. आमिरने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सितारे जमीन पर’ चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाशी मिळती जुळती असेल पण सिक्वल नसेल असेही सांगितले होते.

आणखी वाचा – महिलांच्या शर्टाची बटणं डावीकडे तर पुरुषांच्या शर्टाची बटणं उजवीकडे का असतात?, फॅशन नव्हे तर ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिरच्या हातात काहीतरी आहे. पण त्याचा लूक विचित्र आहे. त्याचे केस मोठे आणि विस्कटलेले आहेत तर चेहरादेखील खूप खराब आहे. त्याचे दातदेखील काळे व घाणेरडे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी दर्शीलनेही आमिरबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. पण हा कोणत्याही चित्रपटाचा सीन नसून एका जाहिरातीचा सीन असू शकतो अशी शक्यता अनेकांनी वर्तवली.  

आणखी वाचा – कामवाल्या बाईला रजनीकांत यांच्याकडून विचित्र वागणूक, कॅमेऱ्यासमोरच ‘ती’ कृती केल्यानंतर चाहतेही भडकले, नेमकं काय घडलं?

नुकताच आमिर मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमामध्ये दिसला होता. यामध्ये आमिरने सलमान खान, शाहरुख खान यांच्याबरोबर डान्सही करताना दिसला होता.

Tags: amir khannew looknew movienew viral looksocial media looksocial media postviral look
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
Next Post
Baby Name On Lord Gautam Buddha

भगवान गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवू शकता तुमच्या मुलांची ही काही खास नावं, नावाच्या अर्थासह पाहा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.