शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ला मिळाली नवीन सोनू, कोण असणार ‘ही’ नवीन अभिनेत्री, निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 4, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
taarak mehta ka oolta chashma new sonu

'तारक मेहता...' मालिकेमध्ये नवीन सोनू भिडेची भूमिका कोण साकारणार?

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेने अध्याप १६ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून अजूनही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आजवर या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पायदेखील घेतला. अशातच आता सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिधवानीनेदेखील या मालिकेला रामराम केला आहे. दोन दिवसांपूर्वी तिचा मालिकेच्या सेटवरील शेवटचा दिवस पार पडला. पलकने शेवटचा दिवस व चित्रीकरणाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केले. तसेच हे फोटों व व्हिडीओ पोस्ट करत तिने भावनिक पोस्टदेखील लिहिली. तिच्या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. (taarak mehta ka oolta chashma new sonu)

पलक गेल्या पाच वर्षांपासून सोनू भिडे ही व्यक्तीरेखा साकारत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिच्यामध्ये आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पलकने ही मालिका सोडल्यानंतर ही भूमिका आता खुशी माळी साकारणार आहे. याबद्दलची माहिती स्वतः निर्माते असित मोदी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, “खुशीला या मालिकेत घेणे योग्य निर्णय होता आणि ती ही भूमिका खूप योग्य प्रकारे करत आहे.”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून बाहेर पडताच वर्षा उसगांवकरांची पहिली प्रतिक्रिया, पोस्टद्वारे म्हणाल्या, “मित्र बनवले आणि…”

View this post on Instagram

A post shared by khushimali | model (@khushimali_14)

पुढे ते म्हणाले की, “आम्ही खुशीचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत आणि तिला आम्ही सगळेच जण खूप पाठिंबा देणार आहोत. ती देखील या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षक तिला तेच प्रेम देतील जे गेल्या १६ वर्षापासून देत आले आहेत”.

आणखी वाचा – इतक्या सुंदर व गोंडस दिसतायत रुबिना दिलैकच्या जुळ्या मुली, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, नावंही आहेत खूप खास

त्याचप्रमाणे खुशीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, “सोनूची भूमिका करताना खूप मजा येणार आहे, तसेच ‘तारक मेहता…’ भाग होणं खूप भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे”. दरम्यान आधीच्या सोनूबद्दल म्हणजे पलकबद्दल सांगायचे झाले तर तिच्यामध्ये आणि निर्मात्यांमध्ये कायदेशीर कारवाई सुरु आहे. पलकने करार मोडल्याचे आरोप निर्मात्यांनी केले होते तर पलकने कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर तिच्या समस्यांमध्ये वाढ केल्याचे आरोप केले होते.

Tags: new sonusonutaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Vishakha Subhedar On Paddy Kamble Insult by Janhvi Killekar

"घराबाहेर येताच मी तिला भेटणार आणि....", पॅडींच्या अपमानावरुन विशाखा सुभेदार जान्हवीला खडसावणार, म्हणाल्या, "तिचं खोटं नाटक..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.