मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याला बर्गर-पिझ्झा दिला व मला…”, पुणे Porsche अपघात प्रकरणावर केतकी चितळेने मांडलं मत, म्हणाली, “पोलिस लाड पुरवत आहेत अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ketaki Chitale expressed her anger regarding the car accident in Kalyaninagar Pune.

"त्याला बर्गर-पिझ्झा दिला व मला...", पुणे Porsche अपघात प्रकरणावर केतकी चितळेने मांडलं मत, म्हणाली, "पोलिस लाड पुरवत आहेत अन्..."

आपल्या बिनधास्त व बेधडक व्यक्तव्यांनी कायमच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. आजवर अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर अभिनेत्री आपली भूमिका मांडत असते. अशातच सध्या राज्यभरात चर्चेत असलेली एक घटना म्हणजे पुणे कार अपघात. पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव आलिशान कारच्या धडकेनं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अटक केलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासांत जामीन मिळाला. यावर समाजमाध्यमांमधून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावर केतकीनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

या प्रकरणी केतकीने तिचा संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “रात्री अडीचच्या सुमारास वेदांत अग्रवाल पबमधून निघाला आणि ३ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्यी अश्विनी व अनिश यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृत व्यक्तींचे मित्रमैत्रीण पोलिस ठाण्यात गेले असताना त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आलेआणि त्यांनाच जाब विचारण्यात आला. या सगळ्या प्रकरणात त्याला वाचवण्यासाठी पोलिसांकडून मदत करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले असल्यामुळे पोलिसांचा हा प्रयत्न फसला.”

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

यापुढे अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. तेव्हा पोलिसांनी तिला कशी वागणूक दिली होती?, तिच्याबरोबरचे पोलिसांचे वागणे कसे होते? आणि आता या गंभीर प्रकरणातल्या आरोपीलाही कशी वेगळी वागणूक मिळत आहे? याबद्दल तिनं संताप व्यक्त केला आहे. याबद्दल केतकीने असं म्हटलं आहे की, “या वेदांतला रात्री बर्गर खाण्याची इच्छा झाली, म्हणून रात्री साडेतीन वाजता पोलिस बर्गर शोधण्यासाठी निघाले. पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना उपाशी ठेवलं जातं.”

आणखी वाचा – Video : कोल्हापूरमध्ये बैलगाडी चालवली, हौस भागली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, काय घडलं पाहा

यापुढे तिने असं म्हटलं की, “पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटरवर वडापावचं दुकान नाही. त्यामुळे आम्हाला तुझ्यासाठी काही खायला आणता येणार नाही असं सांगूनमला साडे सोळा तास उपाशी ठेवण्यात आले होते. पोलिस माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उपाशी ठेवतात. पण या लाडवलेल्या बाळाला लगेच बर्गर आणून दिला जातो आणि तो मुलगा तिथे बसून ते खातही आहे. त्याचे हे सगळे लाड पुरवलेही जात आहेत.”

आणखी वाचा – गरोदरपणामध्ये अभिनेत्रींचं पोट दिसणं चुकीचं का?, दीपिका पदुकोणचं बेबी बंप पाहून नेटकऱ्यांनी केल्या नको नको त्या कमेंट्स, काय घडलं?

यापुढे केतकीने या सगळ्या प्रकरणी तिचा राग व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी कारवाईत केलेल्या हलगर्जीपणाबद्दलही तिचा संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने न्यायालयीन कारवाईबाबतही अनेक गंभीर आरोप व्यक्त करत या सर्व प्रकरणी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा न्याय दिला जातो असंही म्हटलं आहे. सामान्य लोकांसाठी शासन वेगळे आहे आणि श्रीमंत लोकांसाठीचे शासन वेगळे असल्याचे तिने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.          

Tags: ketaki chitalePune Car Accident NewsPune Porsche Car Accident
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Paaru Serial Update

पारू आदित्यच्या प्रेमात असल्याचा अहिल्यादेवींना संशय, वागणूकही बदलली, दिशामुळे मोठा गैरसमज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.