सुपरहिट हिंदी रॅपर व गायक हनी सिंह हा सध्या खूप चर्चेत असलेला पाहायला मिळतो.गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. या क्षेत्रात आल्यानंतर त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो मनोरंजन क्षेत्रापासून पूर्णपणे दूर झालेला पाहायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा नऊ वर्षांनी त्याने पुनरागमन केले. सोनाक्षी सिन्हाबरोबरचे गाणे त्याने केले आणि त्यातून त्याला अधिक पसंती मिळाली. त्यानंतर त्याने अनेक मुलाखती दिल्या. यामध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. (honey singh on divorce)
हनीने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याने घटस्फोटाबद्दल भाष्य केले आहे. २०२३ साली तो बायको शालिनी तलवारबरोबर घटस्फोट घेतला. याबद्दल सांगताना तो म्हणाला की, “मी अनेक वर्ष खूप आजारी होतो. पण मी घटस्फोट घेतला तेव्हापासून मला खूप चांगले वाटत आहे. माझी औषधं कमी झाली आहेत आणि माझ्यामध्ये असणारी सगळी लक्षणंदेखील कमी झाली आहेत.मी जेव्हा शालिनीपासून वेगळा झालो तेव्हा मी सात वर्षांपूर्वीचे आयुष्य जगू लागलो असे वाटायला लागले”.
आणखी वाचा – लेकाला सोडून भारतात परतताना निवेदिता व अशोक सराफ भावुक, म्हणाल्या, “सर्वात कठीण गोष्ट…”
याबरोबरच त्याने ‘पिंकविला’बरोबरदेखील संवाद साधला, तो म्हणाला की, “लग्नानंतर सुरुवातीचे नऊ-दहा महीने खूप छान होते. पण माझ्या करियरमध्ये चांगले दिवस आले तेव्हा पैशाचा अतिवापर केला आणि मी नशेच्या आहारी गेलो. यामुळे माझ्या व शालिनीच्या नात्यात खूप समस्या येऊ लागल्या. त्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०२२-२३ च्या दरम्यान आम्ही घटस्फोट घेतला”.
२००० साली त्याने गायक म्हणून करियरची सुरुवात केली. ‘अंग्रेजी बीट’ या गाण्यामुळे त्याला अधिक पसंती मिळाली. त्यानंतर ‘ब्राऊन रंग’, ‘ब्लु है पानी’ व ‘लुंगी डान्स’ या गाण्यांमुळे तो अधिक प्रकाशझोतात आला. तसेच सध्या तो ‘ग्लोरी’ या अल्बममुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या या अल्बमला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.