अनेक कलाकारांची मुलं आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ सिनेविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला हे गृहीत धरलं जात की, अभिनेत्यांची मुलं अभिनेता किंवा अभिनेत्रीच होणार. परंतु काहीजण या गोष्टीला अपवाद असतात. अशी अनेक कलाकारांची मुलं आहेत ज्यांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्र न निवडता इतर क्षेत्राची निवड केली आहे. याच एक उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीचं नक्कीचं देता येईल. ही जोडी म्हणजे अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ. (Nivedita Saraf Post)
अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या लेकाने म्हणजेच अनिकेत सराफने घरात अभिनयाचा वारसा असताना वेगळी वाट निवडण्याची हिंमत त्याने दाखवली. आई- वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असून अनिकेतने मात्र वेगळे क्षेत्र निवडले. शेफ होण्यासाठीची त्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो.
आणखी वाचा – जय दुधाणेने घेतली नवी कोरी अलिशान कार, वडिलांना मात्र विसरला नाही अभिनेता, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव
सध्या पॅरिस येथे अनिकेत असून तब्बल चार वर्षांनी निवेदिता सराफ व अशोक सराफ हे दोघेही लेकाला भेटायला परदेशात पोहोचले होते. “अखेर चार वर्षांनी आम्ही एकत्र आहोत”, असं कॅप्शन देत निवेदिता सराफ यांनी एकत्र फोटो शेअर केलेलं दिसले. त्यानंतर आता लेकाची भेट घेतल्यानंतर, लेकाबरोबर क्वालिटी टाइम घालवल्यानंतर आता त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. निवेदिता यांनी लेकाबरोबरचा फोटो शेअर करत, “तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला निरोप देणे”, असं कॅप्शन दिलं आहे.
चार वर्षांनी हे सराफ कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर हे सराफ कुटुंब परदेशात एकत्र सुट्टीचा एन्जॉयही करतानाही दिसलं. निवेदिता व अशोक सराफ यांना बरेचदा कामानिमित्त त्यांच्या लेकाला भेटता येत नाही आणि आता भेट झाल्यानंतरही कामामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं, त्यामुळे लेकाचा निरोप घेताना त्या भावुक झालेल्या दिसल्या.