चौसष्ट कला आणि चौदा विद्यांमध्ये पारंगत असलेल्या श्री गणरायांचे उद्या आगमन होते आहे. त्यांच्या आगमनामुळे घरोघरी, गल्लोगल्ली मांगल्य आणि चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण पाहायला आहे. असा हा आनंददायी गणेशोत्सव संपूर्ण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात तर अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाच्या येण्याने संपूर्ण मुंबईनगरी आनंदीत झाली आहे. मुंबई, पुणे, कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले जाते. घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. अवघ्या काही तासांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होईल, त्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरीने सर्वांना एक सल्ला दिला आहे.
अभिनेत्री जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायली या भूमिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. सायली तिच्या वैयक्तिक आयुष्यासह कामाविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे.

मराठीमध्ये अनेकदा काही जण गणपती बाप्पांचा उल्लेख ‘बाप्पा’ असा न करता ‘बप्पा’ असा करतात. याबद्दल जुईने पोस्ट शेअर केली आणि लाल रंगाचा इमोजी म्हणजेच प्रचंड रागाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जुईने लिहिले आहे की, ‘…आणि कृपया ते ‘बाप्पा’ असतं ‘बप्पा’ नाही’. गणपती बाप्पाच्या चुकीच्या उच्चाराबद्दल अभिनेत्रीने राग व्यक्त केला असून सोशल मीडियावर अशाप्रकारे चुकीचा उल्लेख करणाऱ्यांना अभिनेत्रीने पोस्टद्वारे चांगलीच चपराक लावली आहे. तसंच जुईने वापरलेला रागाचा इमोजीच तिच्या यामागच्या भावना व्यक्त करत आहे.
आणखी वाचा – जय दुधाणेने घेतली नवी कोरी अलिशान कार, वडिलांना मात्र विसरला नाही अभिनेता, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव
सार्वजनिक आयुष्यात उद्या सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. याशिवाय मालिका विश्वातही गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतही यंदा बाप्पाच्या आगमनावेळी एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सायलीच्या कानावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली. कानाचा पडदा फाटल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झाली. याबद्दल तिने ओशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली होती.